आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्‍ये डॉग मीट फेस्टिव्हलला विरोध, पोल डान्सर्स उरतल्या रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वत:ला श्‍वानाप्रमाणे बांधून घेतलेली पोल डान्सर - Divya Marathi
स्वत:ला श्‍वानाप्रमाणे बांधून घेतलेली पोल डान्सर
बीजिंग - चीनमध्‍ये डॉग मीट फेस्टीव्हलमध्‍ये प्राण्‍यांवर होणा-या क्रूर अत्याचाराविरुध्‍द विरोध तीव्र होत आहे. देशातील नॅशनल पोल डान्सिंग संघाने श्‍वानाप्रमाणे गळ्यात साखळी बांधून आपला विरोध व्यक्त केला. डान्सर्संनी या माध्‍यमातून लोकांमध्‍ये श्‍वानांच्या सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्‍याचा प्रयत्न केला. त्यांनी पिंज-यात बंद आणि पट्टा बांधलेल्या श्‍वानांप्रमाणे वेगवेगळ्या पोझ दिल्या.

आंतरराष्‍ट्रीय पातळीवर विरोध होऊनही चीनच्या युलिनमध्‍ये डॉग मीट फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. फेस्टिव्हलमध्‍ये मांसासाठी 10 हजार श्‍वानांचा बळी दिला गेला. प्राण्‍यांच्या हक्कासाठी लढणा-या कार्यकर्त्यांनी फेस्टिव्हल बंद व्हावे यासाठी ऑनलाइन मोहिमाही चालवल्या. या मोहिमेला देश-विदेशातील सेलिब्रिटीजंचेही पाठिंबा मिळाला. पण फेस्टिव्हल आयोजनवर बंदी येऊ शकली नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, डॉग मीट फेस्टिव्हलविरोधात पोल डान्सिंग टीम सदस्यांचे छायाचित्रे....