Home | International | China | Chinese Policewoman Praised For Breastfeeding The Hungry Baby Of A Suspect On Trial

आरोपीच्या बाळाला दूध पाजणारी महिला पोलिस इंटरनेटवर VIRAL...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 08, 2017, 12:31 PM IST

चीनच्या पोलिस दलातील या महिला अधिकाऱ्याने जगभरातील लाखो लोकांच्या मनात घर केले आहे.

 • Chinese Policewoman Praised For Breastfeeding The Hungry Baby Of A Suspect On Trial
  पोलिस अधिकारी हाओ लीना...
  बीजिंग - पोलिस म्हटलं की डोळ्यासमोर रागीट आणि कडक व्यक्तीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, चीनच्या पोलिस दलातील या महिला अधिकाऱ्याने जगभरातील लाखो लोकांच्या मनात घर केले आहे. तिच्या मायेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे, की शांक्षी प्रांतातील स्थानिक न्यायालयात एका महिलेला संशयित आरोपी म्हणून कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणी सुरू असताना तिचे बाळ पोलिसांकडे सोपवण्यात आले होते. संशयित आरोपी आई कोर्टात दाखल झाल्याच्या अवघ्या काही क्षणांतच बाळाला भूक लागली. तान्हं बाळ भुकेने तडफडत होता. महिला पोलिस अधिकारी हाओ लिना बाळाला पाहून व्याकूळ झाली. चिमुकला भुकेने रडत असल्याची बाब नुकतीच स्वतः आई झालेली हाओ हिच्या लक्षात आली. त्याच्या आईला कोर्टातून बाहेर बोलवू शकली नाही. तरीही आईची परवानगी घेतली आणि बाळाला मांडीवर घेत आपले दूध पाजले.
  पुढील स्लाइड्सवर पाहा, आईवर कोणते आरोप होते तसेच आणखी काही फोटोज...

 • Chinese Policewoman Praised For Breastfeeding The Hungry Baby Of A Suspect On Trial
  स्वतः आई असल्याने बाळाचे रडणे ऐकूण त्याच्या आईच्या भावना कळाल्या म्हणून हा निर्णय घेतला असे लीना म्हणतात. 
 • Chinese Policewoman Praised For Breastfeeding The Hungry Baby Of A Suspect On Trial
  तेथे उपस्थित एका व्यक्तीने फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. तिच्या या मायेचे जगभर कौतुक होत आहे.
 • Chinese Policewoman Praised For Breastfeeding The Hungry Baby Of A Suspect On Trial
  या बाळाच्या आईला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली कोर्टात आरोपी म्हणून हजर करण्यात आले होते. ती काम करत असलेल्या कंपनीने 2800 लोकांना गंडवले आहे.
 • Chinese Policewoman Praised For Breastfeeding The Hungry Baby Of A Suspect On Trial
  कोर्टातून बाहेर पडून बाळ हातात घेताच तिने बाळाला घट्ट मिठी दिली. संशयित आरोपी मातेचे अश्रू थांबत नव्हते. 
 • Chinese Policewoman Praised For Breastfeeding The Hungry Baby Of A Suspect On Trial
  चिनी माध्यमांमध्येही या महिला अधिकाऱ्याचे तोंडभर कौतुक केले जात आहे.

Trending