बीजिंग - जपानमधील प्रसिद्ध रोबोटिक्स प्राध्यापक हिरोशी इशीगुरो आणि चीनच्या शांघाय यांगयांग इंटेलिजेंट रोबोट सायन्स सर्व्हिस सेेंटर यांनी महिलेच्या रूपातील एक यांत्रिक रोबोट तयार केला आहे. याचे नाव हे यांगयांग आहे. यांत्रिक रोबोटच्या स्वरूपातील ही महिला जिवंत माणसांप्रमाणे बोलू शकते, हात मिळवू शकते तसेच माणसाच्या चेहऱ्यावर निर्माण होणारे सर्व हावभाव
आपल्या चेहऱ्यावर दाखवू शकते. यासाठी तिच्या चेहऱ्यामध्ये ४० मोटार लावलेल्या आहेत. ज्याच्या मदतीमुळे तिच्या चेहऱ्यावरील हावभाव जिवंत वाटतात. रोबोटच्या चेहऱ्याची त्वचा विशेष रबरातून बनवली आहे. त्यामुळेच या रोबोटची त्वचा ही माणसांच्या त्वचेसारखी जिवंत वाटते.