आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सुरक्षेची बोंब, जीव धोक्यात टाकून हजारो फुट उंच पर्वतांवर काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: चीनच्या पिंगजियांग कौंटीत रस्त्याचे काम चालू आहे.)
पिंगजियांग - कोणालाही हजारो फुट उंचावरुन खाली पाहायला खूप भीती वाटेल. मग या कामगारांचे काय कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना त्यांचे काम चालू आहे. तुम्हाला दिसत असलेली छायाचित्र आहे चीनमधील पिंगजियांग कौंटीची. येथे हजारो उंच पर्वतांच्या किना-यावर रस्ता तयार केला जात आहे. दोरीविना आणि सुरक्षा नसतानाही ते कामगार उंचावर काम करित आहेत.
काही छायाचित्रे तर खूप भयावह आहेत.त्यात मजूर पर्वताला आधार दिलेल्या केवळ मेटल रॉडवर चालताना दिसत आहे. या रस्त्याच्या बांधणीमागे च‍िनी सरकारला पर्यटन वाढवायचा उद्देश आहे.प्रशासनाला विश्‍वास आहे, की या माध्‍यमातून आणखी हजारो पर्यटक येतील. पिंगजियांग कौंटीस येथील पर्वतराजीमुळे ओळखले जाते. मुफू पर्वतरांग कौंटीमध्‍ये पसरले आहे. 2011 पासून पर्वतावर रस्ते बांधणीचे काम चालू आहे. रस्ता तयार करण्‍याचे काम खूप वेगळे आहे. तसेच ते धोकादायक ही आहे, असे यू जी या अभियंत्याने सांगितले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, चीनच्या पर्वत कडांवर बांधण्‍यात येत असलेल्या रस्त्याचे photos