आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिगारेट-दारू विकण्याचे चिनी मुस्लिमांना आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजींग - चिनी प्रशासनाने मुस्लिम दुकानदारांसाठी अजब आदेश काढला आहे. दुकानात सिगारेट आणि मद्याची विक्री करण्यात यावी. एवढेच नव्हे तर या सामानाला चांगल्या प्रकारे डिस्प्ले करण्यात यावे. जेणेकरून ग्राहकांचे दुरून सहजपणे लक्ष जाऊ शकेल, असे आदेश म्हटले आहे.

सुपर मार्केट, रेस्तरां आणि हॉटेलमध्ये पाच ब्रँडची मद्ये ठेवणे यापुढे बंधनकारक ठरणार आहे. याचे उल्लंघन करणा-या दुकानदारांवर कारवाई होणार आहे. मुस्लिम बहुल शिंजियांग प्रांतात आदेश काढण्यात आले आहेत. रेडिआे फ्री एशियाने मंगळवारी हे वृत्त दिले आहे. या भागातील मुस्लिम समुदायाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी हे आदेश देण्यात आले असावेत, असा जाणकारांचा अंदाज आहे. दोन वर्षांपासून वाढलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर चिनी सरकारने हा आदेश दिला आहे. लोकांनी आपल्या दुकानांमध्ये २०१२ पासून मद्य आणि सिगारेट ठेवणे बंद केले होते. गावक-यांच्या नाराजीची भिती असल्यामुळे दुकानदारांनी हा निर्णय घेतला होता. मुस्लिम समाजात सिगारेट आणि मद्य वर्ज्य आहे. परंतु आता सरकारच्या आदेशामुळे ही भीती संपलेली आहे.

मशिदीत जाणे, बुरखा घेण्यावर बंदी
चीनमध्ये सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या मुलांना मशिदीत जाणे आणि मुस्लिम सणोत्सव साजरा करण्यास मनाई आहे. रमझानच्या महिन्यात सरकारी कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक देखील रोजे ठेवू शकत नाहीत. अनेक ठिकाणी महिलांना बुरखा घेण्यास मनाई आहे. पुरुषांच्या दाढी वाढवण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

धार्मिक दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न
दक्षिणेकडील शिंजियांगच्या अखताशमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे पदाधिकारी आदिल सुलेमान म्हणाले, सरकारने हा आदेश धार्मिक दहशतवादाचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने दिले आहेत. मद्य आणि सिगारेटवरील निर्बंध, बुरखा परिधान करणे, दाढी राखणे इत्यादी गोष्टी चिनी सरकारच्या दृष्टीने धार्मिक दहशतवाद मानते.