आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे शाळांमध्येच दिले जाते लष्करी प्रशिक्षण; जातो विद्यार्थ्यांचा जीव...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलींनाही ट्रेनिंग बंधनकारक - Divya Marathi
मुलींनाही ट्रेनिंग बंधनकारक
इंटरनॅशनल डेस्क - लष्कराच्या बाबतीत चीन सध्या जगातील सर्वात शक्तीशाली देशांपैकी एक आहे. आपली हीच ताकद कायम टिकवण्यासाठी चीनने 2001 मध्ये आपल्या सर्वच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लष्करी प्रशिक्षण बंधनकारक केले. दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण सुरू करण्यापूर्वीच लष्करी शिबीरांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण एवढे कठोर असते, की दरवर्षी प्रशिक्षणार्थींचा मृत्यू होतो. या प्रशिक्षणापासून मुलींना सुद्धा कुठल्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. 
 

मुलींनाही ट्रेनिंग बंधनकारक
- लष्करी ट्रेनिंगमुळे युवकांमध्ये देशभक्ती आणि बंधुभाव वाढतो असे चीन सरकार तसेच नागरिकांचे देखील म्हणणे आहे. 
- कठिण ट्रेनिंग आणि ड्रिल्समुळे युवकांमध्ये अनुशासन आणि शिस्त निर्माण होते असाही दावा केला जातो. 
- लष्करी कॅम्प युवकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दणकट करण्यासाठी आयोजित केले जातात. 
- विशेष म्हणजे, या कॅम्पमध्ये तरुणींना कुठल्याही प्रकारची सूट दिली जात नाही. त्यांना सुद्धा मुलांप्रमाणेच अतिशय कठोर प्रशिक्षण दिले जाते. 
- दोन आठवडे चालणाऱ्या या शिबीरांमध्ये युवकांना सामान्य शस्त्र चालवण्यापासून केमिकल वेपन हाताळण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले जाते. 
 

लहानपणापासूनच प्रशिक्षण
- चीनच्या नॅशनल डिफेन्स एजुकेशन कायद्या अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लष्करी प्रशिक्षण आवश्यक आहे. 
- हे प्रशिक्षण प्रामुख्याने उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दिले जाते. प्राथमिक शाळेत मुलांना बेसिक स्किल्स शिकवले जातात. 
- माध्यमिक शाळेत आल्यानंतर मुलांना ड्रिल्स आणि आपतकालीन परिस्थितीचे प्रशिक्षण दिले जाते. 
- पद्वीचे शिक्षण घेताना त्यांना अधिकृत लष्करी प्रशिक्षण दिले जाते. यात युवकांकडून कठोर परिश्रम करून घेतले जातात. 
 

चीनची ट्रेनिंग वादग्रस्त
- युवकांना आणि अगदी लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणावर अनेकवेळा वाद झाले आहेत. गेल्या वर्षी ट्रेनिंगमध्ये झालेले अपघात आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यूंचा मुद्दा चिनी माध्यमांनी लावून धरला होता. 
- 2014 मध्ये किंगडाओ शहरात कडक उन्हाळ्यात उष्माघाताने एका मुलाचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या एका शहरात ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षकाने रागावल्यामुळे एका मुलीने आत्महत्या केली होती. 
- मध्यवर्ती हुनान प्रांतात प्रशिक्षणाच्या वेळी झालेल्या अपघातात 42 विद्यार्थी जखमी झाले होते. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, चिनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या लष्करी प्रशिक्षणाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...