आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कम्यूनिस्ट हुकुमशहाने आपल्या सत्ताकाळात 35 हजार तरुणींशी ठेवले होते संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- क्युबा क्रांतीचे प्रणेते व तब्बल पाच दशके अमेरिकी सत्तेला मेटाकुटीस आणणारे क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांचा 13 ऑगस्ट रोजी जन्म दिवस होता. 1959 मध्ये क्रांती करून अमेरिकेचे चमचे फुल्गेंकियो बतिस्ता यांची हुकुमशही सत्ता हटवत त्यांनी सत्ता काबीज केली होती. त्यांना कम्युनिस्ट क्यूबाचे जनक मानले जाते. त्यांच्या आयुष्याबाबत अनेक किस्से प्रसिद्ध राहिले. त्यांच्यावर बनलेल्या एका डॉक्युमेंट्रीत खुलासा करण्यात आला की, कॅस्ट्रो यांनी 82 व्या वर्षापर्यंत सुमारे 35,000 महिलांशी शारीरिक संबंध बनवले होते. कॅस्ट्रो यांनी दावा केला होता की, त्यांच्यावर 634 वेळा हत्या करण्याचा कट रचला गेला. 35,000 महिलांशी ठेवले संबंध....
 
- क्यूबाचे क्रांतीकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांनी वयाच्या 82 व्या वर्षापर्यंत सुमारे 35,000 महिलांशी संबंध बनवले होते. 
- याबाबतचा दावा त्यांच्यावर बनविण्यात आलेल्या एका डॉक्युमेंट्रीत करण्यात आला आहे.
- न्ययॉर्क पोस्टने कॅस्ट्रो यांच्या माजी अधिका-याच्या हवाल्याने सांगितले होते की, फिडेल दररोज किमान दोन महिलांशी सेक्स करायचे.
- हा प्रकार सुमारे चार दशके सुरु होता.
 
फिडेल कॅस्‍ट्रोंचा अल्प परिचय?
 
- डिसेंबर 1959 ते फेब्रुवारी 2008 पर्यंत ते क्‍युबाचे राष्‍ट्रपती होते.
- त्‍यांच्‍यापूर्वी फुल्गेंकियो बाटिस्टा या हुकूमशाची क्‍युबावर सत्‍ता होती.
- फिडेल कॅस्‍ट्रो यांनी लॉची पदवी प्राप्‍त केल्‍यानंतर 1952 मध्‍ये हुकूमशाह बाटिस्टा विरुद्ध निवडणूक लढवली.
- परंतु, बाटिस्टाने मतदान न घेताच स्‍वत:ला विजयी घोषित केले.
- त्‍यानंतर फिडेल कॅस्‍ट्रो याने हुकूमशाहविरुद्ध आंदोलन सुरू केले.
- 26 जुलै 1953 रोजी त्‍यांनी आपल्‍या 100 साथिदारांसह सँटियागो डी क्युबामधील सैनिक बॅरकवर हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न केला.
- यात त्‍यांच्‍या साथिदारांना अटक झाली. पण, फि‍डेल आणि त्‍यांचे भाऊ राउल पळून जाण्‍यात यशस्‍वी झाले.
- त्‍यानंतर त्‍यांनी '26 जुलै मूव्‍हमेंट' नावाची संघटना स्‍थापन केली.
- त्‍या माध्‍यमातून देशभरातून तरुणांचे संघटन बांधून कम्युनिस्ट पार्टीची स्‍थापना केली आणि 1959 मध्‍ये हुकूमशाह बाटिस्टाची सत्‍ता उलथवून लावली.
 
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, क्यूबाचा क्रांतीकारी नेता फिडेल कॅस्ट्रो यांच्यासंबंधित इंटरेस्टिंग फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...