आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलाई लामाच अवताराचे ठरवतील, बौद्ध धर्मातील मोठ्या गुरुंचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - तिबेटचे अाध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या वक्तव्यानंतर चीनकडून आलेल्या तिखट प्रतिक्रियेवर बौद्ध धर्माच्या एका मोठ्या गुरूने पुढील अवतार घ्यायचा की नाही याचा निर्णय दलाई लामाच घेतील, असे म्हटले आहे. त्यावर चीनच्या अधिकाऱ्यांनी हे ठरवण्याचा अधिकार दलाई लामांचा नसल्याचे सांगितले.
निर्वासित तिबेटचे बौद्ध धर्माचे तिसरे मोठे गुरू ग्येन त्रिनले दोरजी म्हणाले, तिबेटी परंपरेमध्ये आम्ही जास्त काही बोलत नाहीत. मात्र, दलाई लामा स्वत:बाबत निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्रिनले यांना करमापा लामाची पदवी मिळाली आहे. ते भारतात निर्वासितांचे आयुष्य जगत आहेत. सन २००० मध्ये भारतात आल्यानंतर करमापांना बीजिंग अाध्यात्मिक अवतार मानतो. करमापा दोरजे यांनी फ्री एशिया रेडिओला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
बातम्या आणखी आहेत...