आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये पॉवर प्लांटचा प्लॅटफॉर्म कोसळला; 40 कामगारांचा दबून मृत्यू, 5 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनधील एका पॉवर प्लांटच्या टॉवरवर बांधण्यात येणारा प्लॅटफॉर्म बांधकाम कोसळून 40 कामगारांचा दबून मृत्यू झाला आहे. 5 जण जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

जियांक्षी प्रांतात फेन्गचेंग शहरात गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. ढिगार्‍याखाली अजून काही लोक अडकले असल्याचे वृत्त आहे. पॉवर प्लांटच्या कूलिंग टॉवरमध्ये प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम सुरु होते. दुर्घटना घडली तेव्हा शेकडो लोक प्लांटमध्ये काम करत होते.

वृत्तसंस्था शिन्हुआने या घटनेचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी 7 वाजता ही दुर्घटना घडली.
- 32 फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून 200 जवान मदतकार्यात सहभागी झाले आहेत.
- फेन्गचेन्ग वर्क सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर युआन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
- दुर्घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आहे. ढिगारा
उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत 40 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुर्घटना घडली तेव्हा 69 कामगार काम करत होते.

7620 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे टॉवर...
- 'जियान्गशी डेली'नुसार, पॉवर प्लांटमध्ये बांधल्या जाणार्‍या 168 फूट उंचीचा कूलिंग 2018 मध्ये पूर्ण होणार आहे.
- 1000 मेगावॉटच्या पॉवर प्लांट यूनिटसाठी 7620 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.
बातम्या आणखी आहेत...