आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Despite Ban Twitter Appoints New Executive Kathy Chen From China

चीनमध्‍ये ट्विटरवर बंदी, तरीही आर्मीमधील इंजिनिअरची कंपनीच्या MD पदी नेमणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को - ट्विटरवर चीनमध्‍ये बंदी आहे. मात्र कंपनीला व्यावसायिक संधी सोडण्‍याची इच्छा नाही. ट्विटरने पीपल्स लिबरेशन आर्मीसाठी काम करणा-या इंजिनिअर कॅथी चेनला चीनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक केली आहे. कॅथीला चिनी तंत्रज्ञान उद्योगात 20 वर्षांचा अनुभव आहे. मात्र या नेमणूकीवरुन ट्विटरवर टीका होत आहे. युजर्स म्हणतात, अगोदर ट्विटरवरील बंदी हटवावे...
- कॅथीला चीन व्यतिरिक्त हॉंगकॉंग, मकाऊ आणि तैवान या विभागाचेही प्रमुख बनवले आहे.
- कॅथी चीनमध्‍ये ट्विटरसाठी जहिरातदार आणि व्यावसायिक भागीदार शोधण्‍याचे काम करेल.
- गेल्या वर्षात ट्विटरच्या चीन जहिरातदारांच्या संख्‍येत 300 पटीने वाढ झाली आहे.
- नेमणूक होताच कॅथने पहिला ट्विट केला, पाठिंब्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार.
सोशल मीडियात कॅथी बनली लक्ष्‍य
- चीनमध्‍ये ट्विटरवर बंदी असूनही एका चिनी महिलेला या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटचे व्यवस्थापकीय संचालक बनवले जाते आणि तिची चिनी लष्‍कराशी बसलेल्या संबंधावरुन सोशल मीडियावर प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.
- एका ट्विटमध्‍ये कॅथीने चीनच्या सरकारी टीव्ही सीसीटीव्हीला प्रतिक्रिया देताना म्हणाली, एकत्र काम करुया आणि जगाला महान अशा चीनची कथा सांगूया.
- अगोदर चीनमधून ट्विटरवरील बंदी हटवा आणि तेव्हा महान चीनची कथा प्रत्यक्षात येईल, यूजर्सने असा प्रतिसाद दिला.
- अमेरिकेत वास्तव्यास असलेले चिनी लेखक येजुई काओने लिहिले, ट्विटरने अशा व्यक्तीची भरती केली जी चिनी लष्‍कराशी संबंधित होती. हा एक गंभीर विषय आहे.
- एका युजरने लिहिले, ट्विटर चिनी जहिराती मिळवण्‍यासाठी काहीही करायला तयार आहे. तुम्हाला वाटते, का याचा चांगला परिणाम दिसेल.
चीनमध्‍ये ट्विटरवर बंदी
- ट्विटर परदेशात क्रियाशील अनेक चिनी राजकीय कार्यकर्त्यांसाठी ऑनलाइन माध्‍यम बनले आहे.