आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्या इशा-याकडे चीनने केले दुर्लक्ष, दक्षिण चिनी समुद्रात पाठवले जहाजे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हांगझोऊ - बराक ओबामा यांनी दिलेल्या इशा-याचा चीनवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. चीनने दक्षिण चिनी समुद्रात फिलीपीन्सच्या किनारपट्टीजवळील वादग्रस्त रीफमध्‍ये मोठ्या प्रमाणावर जहाजे व बोटी पाठवल्या आहेत. हांगझोऊत जी-20 परिषदेत ओबामा यांनी शी जिनपिंग यांना दक्षिण चिनी समुद्रात आक्रमक कारवाया चालू ठेवल्यास गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. फिलीपीन्सचे संरक्षण मंत्री काय म्हणाले...
- फिलीपीन्सचे संरक्षण मंत्री डेल्फिन लॉरेंजाने न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, आमच्याकडे दक्षिण चिनी समुद्रात 5 चिनी तटरक्षक जहाजे आणि 6 इतर बोटींचे छायाचित्रे आहेत. चीनचे हे जहाजे स्कारबरो शोलजवळ उभी आहेत.
- स्कारबरो शोल्सवर चीन आणि फिलीपीन्स, दोघेही मालकीचा दावा करीत आहेत.
- दक्षिण चिनी समुद्रात चीनचे जहाजे आणि बोटी जी-20 परिषदेत ओबामा-जिनपिंग यांची बैठक चालू असताना दिसलेे.
- मार्च महिन्यात वॉशिंग्टनमध्‍ये ओबामांंनी जिनपिंग यांची भेट घेत असताना स्कारबरो शोल्सचे आर्टिफिशियल आइलँडवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करण्‍याचे सांगितले होते.
ओबामांचे हांगझोऊमध्‍ये आगमन होताच चिनी अधिकारी काय म्हणाले ?
- अमेरिकेचे अधिकारी ओबामांनी दिलेल्या इशाराचा काय परिणाम होतो याची वाट पाहत होते.
- चीन कदाचित स्कारबरो शोल्सवर आपल्या हालचाली थांबवेल, असे म्हटले जात होते. मात्र असे काही घडले नाही.
- ओबामा हांगझोऊ विमानतळावर पोहोचताच दोन्ही देशांमध्‍ये दोन मुद्द्यांवरुन तणाव पाहायला मिळाला.
- चीनचे अधिका-यांनी अमेरिकन पत्रकारांना ओरडून सांगितले होते, की हा आमचा देश आहे.
काय आहे स्कारबरो शोल?
- दक्षिण चिनी समुद्रात स्कारबरो शोलला सर्वात वादग्रस्त ठिकाण मानले जाते. चीनने येथे आर्टिफिशियल आयलँडची निर्मिती केली आहे.
- शोल फिलीपीन्सच्या लष्‍करी तळाजवळ असून येथून अमेरिकन लष्‍कर सहज यांचा उपयोग करु शकतो.
- गेल्या काही वर्षांमध्‍ये चीनने दक्षिण चिनी समुद्रात अनेक आर्टिफिशियल आयलँडची निर्मिती केली आहे. स्प्रॅटलिस आयलँडवर या देशाने लष्‍करी सुविधाही उभारल्या आहेत.
- अमेरिकेला चिंता वाटते, की चीन स्कारबरो शोलवर एक मोठे लष्‍करी तळ तयार करायची इच्छा आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, ओबामा यांनी चीनबाबत काय म्हटले होते, दक्षिण चिनी समुद्र वाद काय आहे...
बातम्या आणखी आहेत...