आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियात आहे जमीन- आसमानचे अंतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियातील रेल्वेतील प्रसंग... - Divya Marathi
उत्तर कोरियातील रेल्वेतील प्रसंग...
इंटरनॅशनल डेस्क- कोरियन देश उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात सध्या युद्धाची स्थिती आहे. त्यामुळे जगावर तिस-या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिका, जपानसारखे देश दक्षिण कोरियासोबत आहेत तर चीन, रशियासारखे बलाढ्य देश उत्तर कोरियाच्या मागे आहेत. मात्र, या देशातील तणाव हा काही पहिल्यांदाच तयार झाला आहे असे नाही. सन् 1948 मध्ये दोन्ही देशांदरम्यान फाळणी झाल्यानंतर ते एकमेंकाचे कट्टर वैरी बनले. विकासाच्या बाबतीत दोन्ही देशात आहे जमीन-आसमानचे अंतर...
 
- शीत युद्धानंतर 1948 मध्ये उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया वेगवेगळे देश बनले.  सोबतच उत्तर कोरियात हुकुमशाही सत्तेचा उगम झाला.
- उत्तर कोरियाचे तत्कालीन हुकुमशहा किम इल-सुंगने देशाची सत्ता ताब्यात घेतली. ज्याला जगभर विरोध झाला. मात्र, सुंग कुणापुढेही झुकले नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की हा देश वाळीत पडला गेला. 
- यानंतर उत्तर कोरिया देशाचा विकास करण्याऐवजी शस्त्रास्त्र खरेदीच्या नादाला लागला. ज्यामुळे अमेरिका आणि यूएनने त्यावर अनेक प्रकारचे निर्बंध घातले. त्यामुळे हा देश खड्ड्यात गेला. 
- ठीक याच्या उलट दक्षिण कोरियाने विकासाचा रस्ता धरला व जगभराचा पाठिंबा मिळवला. त्याचमुळे आज उत्तर कोरियात गरिबीने गांजला आहे तर दक्षिण कोरिया विकसित देशांच्या यादीत सामील आहे.
- जर्मन फोटोग्राफर डेइटर लेसनरने दोन्ही देशात फिरून काही खास फोटोज क्लिक केले आहगेत. ज्याद्वारे त्याने दोन्ही देशातील फरक विशद केला आहे. 
- लेसनरने उत्तर कोरियातील हे फोटोज चोरून काढले आहेत. कारण उत्तर कोरियात परदेशी व्यक्तींना आपल्या मर्जीने फोटोग्राफी करण्यास बंदी आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, देन्ही देशातील सद्य स्थिती दाखविणारे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...