आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता मुलाच्या शोधात ठिकठिकाणी भटकतोय हा अपंग पिता, धागेदोरे मिळेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन शेन्गकुआन यांचा मुलगा 15 महिन्यांपूर्वी खेळता-खेळता गायब झाला होता. - Divya Marathi
चेन शेन्गकुआन यांचा मुलगा 15 महिन्यांपूर्वी खेळता-खेळता गायब झाला होता.
गुआंगडोन्ग - एक अपंग पिता सध्‍या चीनच्या रस्त्यांवर आपल्या बेपत्ता मुलाचा शोध घेताना दिसत आहे. 15 महिन्यांपूर्वी चेन शेन्गकुआन यांचा मुलगा गावातच खेळता-खेळता गायब झाला होता. त्याला ते शोधत आहेत. अद्याप कोणतेही धगेदोरे हाती लागलेले नाहीत. मुलाच्या अपहरणाची भीती...
- चेन यांचा मुलगा गावात आपल्या चुलत भावाबरोबर खेळत असताना अचानक गायब झाला.
- वेनझांग शी गावातून जेव्हा मुलगा गायब झाला तेव्हा तो 20 महिन्यांचा होता.
- चेन यांना आता मुलाचे अपहरण झाल्याचे व त्याला विकले गेल्याची भीती सतावत आहे.
- मुलगा बेपत्ता झाल्यानंतर चेनने गाव सोडले असून तो त्याचा ठिकठिकाणी शोध घेत आहे.
- पीपल्स डेली ऑनलाइननुसार, चेन आता गुआंगझोऊच्या रस्त्यांवर आपल्या मुलाचा शोध घेत आहेत.
- 2800 स्क्वेअर मैलात पसरलेले हे शहर चीनमधील मेगा शहरांपैकी एक आहे. हा आकाराने लंडनच्या तुलनेत पाच पटीने मोठे आहे.
- चेनने वृत्तपत्रात आपली कथा लिहिली व त्यासोबत आपल्या मुलाचा फोटो आहे.
- चेनने सांगितले, की पोलीस स्टेशनमध्‍ये त्याचा डीएनए सॅम्पलही घेतला गेला आहे. मात्र अद्याप त्याच्या मुलाचा पत्ता लागलेला नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)