आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे फूड मार्केट, जेथे मिळते अशा प्राण्यांचे मटण, ज्याचा तुम्ही विचारही नाही करू शकणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क-  इंडोनेशियातील उत्तरी सुलावेसी प्रांतात टोमोहोन असे शहर आहे, जे चित्र-विचित्र खाण्यासाठी चीनलाही टक्कर देतो. येथील ट्रॅडिशनल मार्केटमध्ये आपल्याला माकड,  मांजर, कुत्रा, डुक्कर, उंदीर, वटवाघूळ, स्लॉथ आणि साप आदींचे मटण मिळते. 44 वर्षीय फोटोग्राफर आणि ब्लॉगर रेमंड वाल्शच्या माहितीनुसार, हे जगातील  एक असे मार्केट आहे, जेथे सर्व प्रकारच्या जनावरांचे मटण मिळते. प्राण्यांचा त्रासदायक मृत्यू पाहणे फारच दु:खद...
 
- या मार्केटमधील काही फोटोज ओमानचा 44 वर्षीय फोटोग्राफर आणि ब्लॉगर रेमंड वाल्शने टिपले आहेत. 
- रेमंडने लिहले की, मेलेल्या जनावरांचे मटण घेणे सामान्य वाटते पण त्यांचा त्रासदायकरित्या झालेला मृत्यू फारच वेदना देतो.
- रेमंड वाल्शने लिहले की, जगातील विकसनशील देशांत अशा प्रकारची अनेक पारंपारिक मार्केट आहेत.
- फक्त फरक एवढाच की, येथे सर्व प्रकारच्या जनावरांचे मटण विकायला उपलब्ध असते. 
- आपल्या ब्लॉगवर त्याने लिहले की, टोमोहोन मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या जनावरांचे मटण मिळत होते. 
- सर्व प्रकारच्या जानवरांचे मटण एकाच वेळी विकताना मी प्रथमच पाहिले असे रेमंड सांगतो. 
-तो म्हणतो, पश्चिमी देशांत कुत्रे-मांजराबाबत वेगवेगळ्या भावना आहेत.  
- तिकडे लोक त्यांना पाळतात तर, दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशात त्यांना चवीने खाल्ले जाते. 
 
जानवरांना क्रूर पद्धतीने मारले जाते- 
 
- टोमोहोन सिटीतील हे मटण मार्केट जगातील क्रूर मार्केटपैकी एक मानले जाते. 
- येथील कुत्र्यां-मांजरांना तर थेट गॅसनेच भाजले जाते.  
- काही काही ठिकाणी कुत्रे-मांजराना उकळत्या पाण्यात टाकून शिजवले जाते.
- सापांना मारण्याचीही हीच पद्धत वापरली जाते त्यांना उकळत्या पाण्यात टाकले जाते.
- मगरीलाही अतिशय क्रूर पद्धतीने मारले जाते. तिच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून तिला बेशुद्ध केले जाते. 
- यानंतर मगरीचे कातडे काढले जाते. मगरीच्या मटणाशिवाय त्याची कातडीही खूप महाग विकली जाते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा,  PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...