आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या शिजियांग आणि भारतात अंदमानात भूकंप, चार ठार, 48 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूकंपामुळे भिंतीला तडे गेले - Divya Marathi
भूकंपामुळे भिंतीला तडे गेले
बीजिंग – दक्षिण चीनच्‍या शिजियांग शहरामध्‍ये आज (शुक्रवार) सकाळी नऊ वाजून सात मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार पहाटे 6.38 मिनिटांनी) 6.5 तीव्रतेच्‍या भूकंपाचे धक्के बसले. यात चौघांचा मृत्‍यू झाला तर 48 जण जखमी झाले आहेत. त्‍याचे केंद्र जमिनीच्‍या खाली दहा किलोमीटर खोल उत्‍तर दिशेला 37.5 डिग्री आणि पूर्वेकडे 78.2 डिग्री असे होते.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनने दिलेल्‍या माहितीनुसार, भूकंपामुळे शिजियांगमध्‍ये अनेक घरांची पडझड झाली आहे. संपर्क तुटला आहे. पहिल्‍या झटक्‍यानंतर 3.0 आणि 4.6 तीव्रताचे झटके सुद्धा जाणवले. चीनच्‍या आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभागाने सांगितले, सुरक्षेच्‍या दृष्‍टीने होतन शहराचे विमानतळ बंद करण्‍यात आले आहे.
अंदमानमध्‍येही झटके
चीनशिवाय भारतच्‍या अंदमान व्दिप समुहावरही सकाळी 6.08 वाजता भूकंपाचे सौम्‍य झटके जणावले. त्‍यांची तीव्रता 4.2 रिक्टर स्केल होती. त्याचे केंद्र जमिनीच्‍या 25 किलोमीटर खोल 13.3 डिग्री उत्तर अक्षांश आणि 93.2 डिग्री पूर्वकडे आहे.
एकाच वर्षात आठ वेळा भूकंप
भूकंपचे केंद्र शिनजियांगच्‍या गुमामध्‍ये होते, असा अंदाज चीनच्‍या अर्थक्वेक नेटवर्क सेंटरचे संशोधक सन शिहोंग यांनी वर्तवला. शिनजियांगमधील एकाच सप्‍ताहात झालेला दुसरा तर वर्षातील हा आठवा भूकंप आहे. गुमा येथील लोकसंख्‍या 2 लाख आहे. येथील बहुतांश व्‍यक्‍तींचा शेती हा व्‍यवसाय असून, मुस्‍लीमांची संख्‍या अधिक आहे. वर्ष 2008 मध्‍ये चिनमधील सिचुआनमध्‍ये झालेल्‍या भूकंपात 70 हजार व्‍यक्‍तींचा मृत्‍यू झाला होता.
हिमालयाच्‍या परिसरातून गेली 700 वर्षे जुनी फॉल्ट लाइन

अर्थक्वेक ट्रॅक एजेंसीच्‍या दाव्‍यानुसार, हिमालयाच्‍या परिसरातून 700 वर्षे जुनी फॉल्ट लाइन गेल्‍याने आशिया खंडात जास्‍त भूकंप येत आहेत. यंदा एप्रिल-मे महिन्‍यात नेपाळमध्‍ये झालेल्‍या भूकंपात 8 हजारांच्‍या जवळपास लोक ठार झाले होते. हिमालय काही सेंटीमीटरने उत्‍तरेकडे सरकत आहे. यावर भारत सरकारच्‍या मदतीने अमेरिकेचे संशोधक संशोधन करत आहेत. या अभ्‍यासाचा शोध निबंध यूएस जर्नल लिथोस्फीयर आणि जेजीआरमध्‍ये छापून आला. जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडवांस सांयटिफिक रिसर्चचे सी.पी. राजेंद्रन यांनी या शोधनिबंधाच्‍या आधारे सांगितले, हिमालय 700 वर्षे जुन्‍या फॉल्ट लाइनवर आहे. त्‍यामुळे गत 500 वर्षांत झाले नाहीत एवढे मोठे भूकंप येथे होत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भूकंपानंतरचे दृष्य