आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beijing Quarantine Authorities Intercept Lethal Frogs

PHOTOS : या गोल्डन डार्ट बेडकाचे १ ग्रॅम विष घेऊ शकते १५ हजारांचे प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेडूक दाखवताना अधिकारी. - Divya Marathi
बेडूक दाखवताना अधिकारी.
बीजिंग - चीनच्या अधिकाऱ्यांनी एका पार्सलमधील अत्यंत विषारी १० बेडूक जप्त केले आहेत. या गोल्डन डार्ट बेडकांचे फक्त १ ग्रॅम विष १५ हजार लोकांचा जीव घेऊ शकते. हे पार्सल पोलंडहून आले होते.

बीजिंगच्या क्वारंटाइन अधिकाऱ्यांनी हे पार्सल या महिन्याच्या सुरुवातीला पकडले होते. त्यावर ‘कपडे आणि भेट’ असे लिहिले होते. संशय आल्याने पार्सल उघडण्यात आले. त्यात प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये चमकदार रंगांचे बेडूक होते. बीजिंग येथील इन्स्पेक्शन अँड क्वारंटाइन विभागाच्या माहितीनुसार, दोन इंच लांबीचे हे गोल्डन डार्ट बेडूक पृथ्वीवरील सर्वात घातक मानले जाते. हे बेडूक कोलंबियाच्या प्रशांत महासागराच्या किनाऱ्याजवळील जंगलात आढळते. यापूर्वी सप्टेंबर २०१५ मध्ये हाँगकाँगहून आलेल्या एका पार्सलमधूनही असेच काही बेडूक आले होते. या बेडकाच्या काही प्रजाती धोक्यात अाहेत.

कागदात गुंडाळले होते
कस्टमच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी हे पार्सल कपडे आणि वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळलेले होते. एक्स-रे मशीनची दिशाभूल करण्याचीही त्याची इच्छा होती.