Home | International | China | Face screening for attendance at Chinese University

चिनी विद्यापीठात हजेरीसाठी फेस स्क्रीनिंग; हेअर स्टाइल बदलून विद्यार्थी मारत होते दांडी

वृत्तसंस्था | Update - Oct 29, 2017, 03:00 AM IST

चीनच्या पूर्वेकडील शहर नॅजिंगच्या कम्युनिकेशन युनिव्हर्सिटीत विद्यार्थी- विद्यार्थिनींना नेहमी वर्गात दांडी मारण्याची सव

 • Face screening for attendance at Chinese University
  बीजिंग- चीनच्या पूर्वेकडील शहर नॅजिंगच्या कम्युनिकेशन युनिव्हर्सिटीत विद्यार्थी- विद्यार्थिनींना नेहमी वर्गात दांडी मारण्याची सवय होती. हजेरी लावण्यासाठी विद्यार्थी एकमेकांना मदतही करत होते. यावर उपाय शोधत विद्यापीठाने विद्यार्थ्याची खरी ओळख व्हावी यासाठी फेस ट्रेस डिव्हाइसचा उपाय शोधला आहे.

  फेस स्क्रीनिंगआधी विद्यार्थी गायब होण्यासाठी मेकअपपासून हेअर स्टाइल बदलत होते. ७० ते ८० विद्यार्थ्यांच्या वर्गात प्राध्यापकांना हजेरीवेळी संभ्रम निर्माण होत होता.

  नव्या प्रणालीने वेळेची बचत होते. मात्र, तरीही पेन आणि कागदाची पद्धत सुरूच ठेवली जाईल. या पद्धतीमुळे प्राध्यापकांचा हजेरी घेण्याचा ताण कमी झाला आहे. यासोबत वर्गात विद्यार्थ्यांच्या हजेरीचे प्रमाणही वाढले आहे.
  - शेन हाओ, प्राध्यापक

  विद्यार्थ्यांना प्रणाली आवडली
  फेस ट्रेस प्रणाली विद्यार्थ्यांना आवडली आहे. ही अनोखी कल्पना आहे. या सुविधेमुळे प्राध्यापकांना हजेरी भरण्याच्या प्रक्रियेपासून मुक्ती मिळेल. या तंत्राचा उच्च शिक्षण संस्थामध्येच वापर व्हावा,असे विद्यार्थ्यांचे मत आहे.

  मुलांना लठ्ठपणापासून सुटका देण्यासाठी वेट लूज क्लास, ग्रेड याच आधारावर मिळतील
  नॅजिंग कृषी विद्यापीठाने लठ्ठ मुलांसाठी डाएट व व्यायाम सक्तीचा केला. व्यायामात जोर- बैठका व जॉगिंगचा समावेश आहे. प्रा. झोऊ क्वांफू म्हणाले, लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोर्समध्ये ६० % गुण वजन कमी करण्याच्या प्रयत्नाना दिले आहेत.

Trending