आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facts About Chinese New Year Chinese Lunar New Year Celebration

PHOTOS: चिनी नववर्ष सुरु, जगातील 12 देशांमध्‍ये जल्लोषाची धूम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: बीजिंगमध्‍ये कागदाच्या कंदीलाजवळ पोज देताना महिला.

बीजिंग - चीनमध्‍ये गुरूवारपासून (ता.19) नव्या वर्षाचा आनंदोत्सव सुरु होत आहे. त्यास स्प्रिंग फेस्टिव्हल आणि लूनर न्यू इयर या नावाने ओळखले जाते. नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून जल्लोष सुरु होतो. प्रत्येक वर्ष कोणत्या तरी प्राण्‍याचे प्रतिक माना मानण्‍यात येते. वर्ष 2015 चे लूनर इयर मेंढीचे प्रतिक मानले जाते. 15 दिवसांपर्यंत चालणा-या या जल्लोषात प्रत्येक दिवस खास असतो.

चीनबरोबरच जवळ-जवळ 12 देशांमध्‍ये लूनर इयर साजरा केला जातो. नव वर्षनिमित्त लोक आठवडाभर दीर्घ सुट्या घेतात.वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात झाडू लावले जाते.यामुळे समृध्‍दी निघून जाते.ड्रॅगन डान्स आणि यात्रा हे या उत्सवाचे महत्त्वाचे भाग आहे.

जगातील सर्वात मोठी आतषबाजी
नववर्षानिमित्त चीनमध्‍ये सर्वात मोठी आतषबाजी केली जाते.मध्‍यरात्रीपासून यास सुरुवात होते. प्रकाश आणि आतषबाजीमुळे वाईट आत्मे निघून जातात. 90 टक्के फटाके चीनमध्येच तयार होतात.

वेगवेगळ्या दिवशी नवीन वर्ष
चीनमध्‍ये प्रत्येक वर्षी लूनर इयरची तारीखा वेगवेगळ्या असतात. येथे नव वर्षाची तारीख च‍िनी लूनर कॅलेंडरद्वारे निश्चित होते. 21 जानेवारी ते 20 फेब्रूवारी दरम्यान कधीही नव वर्ष सुरु होऊ शकते. यावर्षी नव वर्ष 19 फेब्रूवारीपासून सुरु होत आहे.

पुढे पाहा, लूनर न्यू इयरशी संबंधित काही गोष्‍टी आणि जल्लोषाची छायाचित्रे...