आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमधील हेनान प्रांतात वृद्धाश्रमात आग, 38 जणांचा होरपळून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनमधील हेनान प्रांतातील पिंगडिंगशान येथे एका वृद्धाश्रमाला आग लागून 38 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्याचप्रमाणे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

वृत्तसंस्था 'शिन्हु्आ'च्या अहवालानुसार, सोमवारी (25 मे) रात्री उशीरा ही दुर्घटना घडली. पिंगडिंगशान येथील एका अपार्टमेंटला आग लागली. आग इतकी झपाट्याने पसरली की अपार्टमेंटमध्ये असलेल्या वृद्धाश्रमातील 38 जणांचा होळपळून मृत्यू झाला. सहा जण गंभीर भाजले गेले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आग लागली तेव्हा वृद्धाश्रमात 130 लोक उपस्थित होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, 'ट्‍विटर'वर पोस्ट करण्यात आले आगीचे फोटो..