आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांचा मुलगा बूडत होता स्विमिंग पूलमध्‍ये, आई मात्र बिझी होती मोबाईलमध्‍ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुुलगा डुबत असताना आई मोबाईल पाहत होती. - Divya Marathi
मुुलगा डुबत असताना आई मोबाईल पाहत होती.
बीजिंग- चीनमध्‍ये चार वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्‍ये बुडून मृत्‍यू झाला आहे. पूलमध्‍ये गेल्‍यावर आई मोबाईलमध्‍ये व्‍यस्‍त होती. यादरम्‍यान मुलगा पुलातील खोल पाण्‍याकडे ओढला गेला. पूलाची खोली 0.3 ते 1.3 मीटर आहे. बऱ्याच वेळानंतर आईला मुलाचे लक्ष आल्‍यावर तिने शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र तोपर्यंत मुलाचा मृत्‍यू झाला होता. 
 
घटना CCTV मध्‍ये कैद 
- चीनमधील शियानयंग रिसॉर्टमध्‍ये घटना घडली. 
- शियाओ नामक महिला आपल्‍या चार वर्षीय मुलासोबत इथे आली होती. 
- सीसीटीव्‍ही फूटेजमध्‍ये स्‍पष्‍ट दिसत आहे, महिला स्विमिंग पूलमध्‍ये उतरल्‍यावर मोबाईलमध्‍ये पूर्ण व्‍यस्‍त झाली होती.
- यादरम्‍यान मुलगा बघता बघता पुलातील तीन मीटर खोल पाण्‍याकडे ओढला गेला.
- पूलामध्‍ये शियाओ आणि तिच्‍या मुला‍व्‍यतिरिक्‍त इतर आणखी सात ते आठ स्विमर उपस्थित होते. 
- जवळपास तीन मिनिटे मुलाने बचावासाठी हात पाय मारत इतरांना आवाज देण्‍याचा प्रयत्‍न केला.
- मात्र कोणाचेही त्‍याकडे लक्ष गेले नाही. शेवटी तीन मीटर खोल पाण्‍यात बुडून त्‍याचा करुण अंत झाला. 

खूप वेळानंतर आईच्‍या लक्षात आले 
- शियाओ यांच्‍या मित्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार खूप वेळाने आईला आपल्‍या मुलाचे लक्ष आले. 
- यानंतर त्‍याचा शोध घेण्‍याचा शियाओने खूप प्रयत्‍न केला. रिसॉर्टच्‍या स्‍टाफचीही मदत घेण्‍यात आली. 
- एका तासानंतर पूलाच्‍या तळाशी 3 मीटर खोल मूलाचा मृतदेह सापडला. 
- सध्‍या पूल बंद करण्‍यात आला असून पोलिस घटनेची चौकशी करत आहेत. 
- चीनची सोशल वेबसाईट पीपल्‍स डेलीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर पोस्‍ट केला आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनेचे फोटोज...