आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयव दान करून ६ व्यक्तींना नवे जीवन, अवयवदानासाठी पित्याने दिली संमती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- ज्या रुग्णांनी जगण्याची उमेदच गमावली आहे अशांना आमच्या मुलाचे अवयव द्या, अशी इच्छा पित्याने व्यक्त केली. डॉक्टरांना त्यांनी हा निर्णय ऐकवला व ते मुलाच्या देहाला बिलगून भावविवश झाले. ‘माझा हा निर्णय तुझ्या आत्म्याला शांती देईल’, असे भावोद््गार या पित्याने काढले.
आपल्या मुलाचीही अशीच इच्छा होती असे ते म्हणतात. चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंग्दू शहरातील ही घटना. जवळच असलेल्या एका गावातील २४ वर्षीय तरुण जियाआे यूसची ही कहाणी. गेल्या महिन्यात जियाआेला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याच्या नातलगांनी त्याच्या उपयुक्त अवयवांना दान करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे अधिकाधिक रुग्णांना जीवदान देण्याचा त्यांचा उद्देश होता. याचा लाभ ६ रुग्णांना झाला. त्यांना नवजीवन मिळाले. शांघाईच्या हुशान रुग्णालयात जियाआे यूसने शेवटचा श्वास घेतला. याच महिन्यात २ नोव्हेंबर रोजी त्याचे एक मूत्रपिंड २५ वर्षीय रुग्णाला तर दुसरे ३७ वर्षीय महिलेला दान करण्यात आले. काही दिवसांतच कॉर्निया, यकृत आणि फुफ्फुसांचेही प्रत्यारोपण करण्यात आले. सर्व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे वृत्त डॉ. झांग मिंग यांनी जियाआेच्या वडिलांना दिले.

चीन अवयवदानात पुढे
मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांचे अवयव दान करण्यावर या वर्षाच्या सुरुवातीला कायद्याने बंदी घालण्यात आली.त्यानंतर चीनमध्ये अनेक जण स्वेच्छेने अवयव दानासाठी पुढे आले. ऑगस्टपर्यंत १ हजार ४७९ लोकांनी अवयव दान केले.