आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीतून आई वाचवाल की गर्लफ्रेंड?, परीक्षेतील प्रश्नाने विद्यार्थी पडले पेचात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- ‘भीषण आग लागली आणि त्या आगीत सापडलात तर तुम्ही कोणाला वाचवाल, आईला की मैत्रिणीला?’ मैत्रिणीने असा प्रश्न विचारला की बहुतांश पुरुष पेचात पडतात. आई असे उत्तर द्यावे की मैत्रीण, असा प्रश्न त्याला पडतो. मात्र, हा काही गर्लफ्रेंडने आपल्या मित्राला पेचात टाकण्यासाठी विचारलेला प्रश्न नव्हे. चीनमध्ये वकिली करण्यासाठी उमेदवार सक्षम आहे का, हे तपासण्यासाठी राष्ट्रीय न्यायिक परीक्षेला बसलेल्या लाखो वकील आणि न्यायाधीशांना हा अवघड, पेचात टाकणारा प्रश्न विचारण्यात आला होता.
जर एखादा पुरुष आईला वाचवण्यास सक्षम असेल, पण त्याऐवजी त्याने मैत्रिणीला वाचवले तर त्याने कारवाईस अपात्र गुन्हा केला आहे का, असा हा प्रश्न होता.

नेटिझन्समध्ये चर्चेला ऊत : यावरून सोशल मीडियात जोरदार चर्चा झडली. आईला संकटात टाकून पळून जाणे अमानवी आहे, असे म्हणून काहींनी या उत्तराशी सहमती दर्शवली. ‘मी निश्चितपणे आधी आईलाच वाचवले असते. कायदेशीर बाब सोडून द्या, पण आईने माझे पालनपोषण केले हे जास्त महत्त्वाचे आहे. मैत्रीण तरुण आहे. म्हणजेच स्वत:ला संकटातून बाहेर काढण्याची जास्त संधी तिला उपलब्ध आहे,’ असे उत्तर एका नेटिझनने दिले.
आईऐवजी मैत्रिणीला वाचवणे अदखलपात्र गुन्हा
‘द ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या कायदा मंत्रालयाने २४ सप्टेंबरला प्रश्नांची उत्तरे प्रसिद्ध केली. आगीत सापडलेल्या आईऐवजी मैत्रिणीला वाचवले तर चीनमध्ये अदखलपात्र गुन्हा ठरतो, असे उत्तरात नमूद करण्यात आले होते. चीनच्या कायद्यानुसार, एखाद्या पुरुषाने मैत्रिणीऐवजी आईला वाचवणे कायद्यानुसार अनिवार्य आहे.
कायदा अन्यायकारक
काहींनुसार हा कायदा अन्यायकारक आहे. ‘प्रत्येक जिवाची किंमत सारखीच. आईला व मैत्रिणीला वेगळा न्याय कसा?,’ असा सवाल अनेक नेटिझन्सनी उपस्थित केला.