आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातक रसायन व्हीएक्सने किम यांच्या भावाची हत्या, मलेशिया पोलिसांचा अहवाल, यूएनच्या यादीत समाविष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालम्पूर- उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांचे सावत्र भाऊ किम जाँग नाम यांची घातक रसायन व्हिएक्सच्या साह्याने हत्या करण्यात आल्याचा दावा मलेशियाच्या पोलिसांनी केला आहे.
 
क्वालालम्पूर विमानतळावर एका महिलेने जाँगच्या चेहऱ्यावर व्हीएक्स लावले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. टॉक्सिकॉलॉजी अहवालात मलेशिया पोलिसांनी व्हिएक्स एक रंगहीन, गंधहीन, स्वादहिन घातक घटक आहे.
 
संयुक्त राष्ट्राच्या घातक रसायनाच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे काही गोष्टींचा खुलासा झाला आहे. दोन महिला जाँग यांच्याजवळ आल्या व त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर किमने विमानतळावरील कर्मचाऱ्यांची मदतही घेतली.
 
बेशुद्धावस्थेत असताना त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यासंबंधी मलेशियाच्या पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. यात हल्ला करणाऱ्या महिलेचाही समावेश आहे. दुसरीकडे उत्तर कोरियाच्या मीडियाने या प्रकरणात मलेशियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...