आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: चीनमध्‍ये पूर, छतावर अडकल्या गाड्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: चीनच्या यूडांग शहरात पूरामुळे छतावर अडकलेल्या गाड्या.
बीजिंग - चीनच्या युनान प्रांतातील यूडांग शहरात सलग तीन दिवस पाऊस चालू होता. सततच्या पावसामुळे सोमवारी(ता.11) अचानक आलेल्या पूरामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला असून दोन लोक बेपत्ता झाले आहेत. पाऊस आणि पूरामुळे वेगवेगळ्या घटनांमध्‍ये अनेक लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे पाच हजारपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत.
स्थान‍िक माध्‍यमांच्या वृत्तानुसार पूरामुळे काही तासा करिता रस्त्यांवर 8 फुटापर्यंत पाण्‍याची पातळी वाढली होती. मुसळधार पाऊसामुळे यांगत्से नदी धक्क्याची पातळी ओलांडली आहे.शाळा बंद राहू नये यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्‍यांना दुस-या शहरात पाठवण्‍यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, चीनच्या यूडांग शहरात सततच्या पावसानंतर निर्माण झालेली स्थिती...