आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठी हि-यांची खाण, जिने रशियाला बनविले श्रीमंत, समृद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियातील ‘मिर’ डायमंड माईन... - Divya Marathi
रशियातील ‘मिर’ डायमंड माईन...
इंटरनॅशनल डेस्क- गेल्या शुक्रवारी रशियातील सर्वात मोठी ‘मिर’ नावाच्या डायमंड खाणीतील एक पाईप फुटल्याने तेथे पूरच आला होता. या पूरात 142 मजूर फसले होते ज्यातील 133 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आले आहे. बाकी लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. ईस्ट सायबेरिया स्थित या खाणीतून दरवर्षी जगातील 23 टक्के रफ डायमंड काढले जातात. दुस-या महायुद्धातील खर्चाने खचलेल्या रशियाला पुन्हा बनवले श्रीमंत....
 
- दुस-या महायुद्धानंतर (1939 ते 1945) सोव्हियत युनियन (आताचा रशिया) भूकबळीने त्रस्त होता.
- सोबतच संयुक्त राष्ट्राने सोव्हियत युनियवर घातलेल्या विविध आर्थिक प्रतिबंधामुळे देश कंगाल बनला होता.
- अशा अडचणीच्या काळात 13 जून 1955 मध्ये सोव्हिएत भूशास्त्रज्ञन युरी खैबरदिन यांनी या खाणीचा शोध लावला होता. 
- रशियात अशा प्रकारचे हे पहिले संशोधन होते. यामुळे 1957 मध्ये युरी यांना लेनिन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, हा पुरस्कार सोव्हिएत संघाचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
- मात्र नंतर या खाणीमुळे रशियाला आर्थिक तंगीतून बाहेर येण्यास मदत झाली.
 
दरवर्षी काढले जातात एक कोटी कॅरेट (2,000 किलो) हिरे-
 
- या खाणीची सुरुवात 1957 च्या कडाक्याच्या थंडीत करण्यात आली होती. सायबेरियामध्ये वर्षातील सात महिने कडाक्याची थंडी असते. 
- अशा वातावरणात जमीन एकदम कडक होते. त्यामुळे कर्मचार्‍यांना ही जमीन खोदणे म्हणजे लोखंडाचे दाणे चावण्यासारखेच होते. 
- कर्मचारी जेट इंजिनच्या मदतीने हिरे बाहेर काढत. कधी कधी डायनामाईटचाही वापर करण्यात येत असे. या खाणीतून 44 वर्षांपर्यंत हिरे काढण्यात आले. 
- या खाणीचे काम जेव्हा सर्वोच्च शिखरावर होते, तेव्हा येथून दरवर्षी एक कोटी कॅरेट (2,000 किलो) हिरे काढले जात. या खाणीतून 3,600 लोकांचा उदरनिर्वाह होत होता.
 
खाणीवरून हेलिकॉप्टर नेण्यास बंदी-
 
- 2011 मध्ये सुरक्षेच्या कारणांमुळे ही खाणी बंद करण्यात आली होती. मात्र पुन्हा 2015 मध्ये ती चालू करण्यात आली.
- खाणीवरुन जाणा-या अनेक हेलिकॉप्टरला अपघात झाले होते. त्यामुळे खाण बंद करण्‍यात आली. खोदकाम इतके खोल होते की आतून वाहणारी हवा वरुन जाणा-या हेलिकॉप्टर्संना आपल्याकडे ओढत असे. त्यामुळे अपघात होते.
- नंतर तेथे अंडरग्राऊंड टनल्स बांधले गेले व नंतर खाण सुरु झाली.
- या खाणीची खोली 525 मीटर आणि रुंदी 1,200 मीटर एवढी होती. बिंघम कॅनियन खाणीनंतर 'मिर' ही जगातील दुसरी सर्वात मोठी खाण आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मिर डायमंड माईनचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...