आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाँगकाँगच्या दोन खासदारांना चीनने पदग्रहणापासून रोखले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग - चीनने हाँगकाँगच्या निवडणुकीत पुन्हा हस्तक्षेप केला आहे. चीनच्या नावाने शपथ घेण्यास नकार देणाऱ्या हाँगकाँगच्या दोन संसद सदस्यांना चीनने पदग्रहणापासून रोखले आहे. हाँगकाँगमध्ये चीनबद्दल निष्ठेची शपथ घेणारेच काम करू शकतील, असेही चीनने स्पष्ट केले आहे. याआधीही हाँगकाँगमध्ये कोणी निवडणूक लढवावी, कोणी लढवू नये हेही चीननेच निश्चित केले होते.
सिक्सट्स ल्योंग आणि याऊ वाई-चिंग या दोन नवनिर्वाचित संसद सदस्यांनी शपथग्रहण समारंभात सांगितले की, हाँगकाँग हा चीनचा भाग नसल्याने आम्ही चीनशी निष्ठा ठेवण्याची शपथ घेऊ शकत नाहीत. त्यानंतर या दोघांना पदग्रहणापासून रोखण्यात आले. हाँगकाँगचे मुख्य प्रशासक सिवाई ल्योंग यांनी म्हटले आहे की, आमचे सरकार चीनच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करेल. हाँगकाँगमध्ये रविवारी लोक चीनच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. हा हाँगकाँगच्या लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि कायदेशीर प्रक्रियेवर कठोर प्रहार आहे, चीन हाँगकाँगमध्ये लोकशाही निर्मूलनाचा प्रयत्न करत आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.
दोन्ही खासदार लोकशाही समर्थक :
चीनने ज्या दोन संसद सदस्यांना रोखले आहे ते लोकशाहीचे समर्थक असून त्यांना चीनकडून हाँगकाँगला स्वातंत्र्य हवे आहे.

शपथेचे शब्द बदलत होते
दोन्ही संसद सदस्य सप्टेंबरमध्ये निवडून आले होते. तेव्हापासून त्यांनी अनेकदा चीनशी निष्ठा असणारी शपथ घेतली आहे. पण शपथ घेताना शब्द बदलत होते. त्यामुळे चीनचे नेतृत्व भडकले होते. गोंधळाच्या वातावरणात त्यांची शपथ प्रत्येक वेळी रद्द केली जात होती.

न्यायालय अजूनही स्वतंत्र
ब्रिटनने १९९७ मध्ये हाँगकाँग चीनला सोपवले होते. हाँगकाँगचे न्यायालय स्वतंत्र राहील आणि चीन त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे आश्वासन तेेव्हा देण्यात आले होते. आतापर्यंत ही व्यवस्था सुरू आहे. पण चीनच्या नव्या हस्तक्षेपामुळे त्यावरही संकट दिसत आहे.
बातम्या आणखी आहेत...