आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आजचे अत्याधुनिक चीन 1930 मध्ये दिसायचे काहीसे असे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग येथील लोक. - Divya Marathi
हाँगकाँग येथील लोक.
चीनबाबत जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा सर्वात आधी रोबोट्स, गॅझेट्स आणि उंचच्या उंच इमारती असे चित्र आपल्यासमोर उभे राहते. या साम्यवादी देशाने काळाबरोबर अत्यंत वेगाने स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करून घेत विकासाकडे वाटचाल केली आहे. आज चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. फोटोद्वारे आम्ही आपल्याला आज 1930 च्या दशकातील चीन दाखवणार आहोत. फोटोग्राफर हँलंड ल्योन यांनी हे फोटो टिपले आहेत.

चीनची इंग्रजी वेबसाईट चायनाडोलीच्या मते ल्योन यांचे हे अनेक दिवसांनंतर आता समोर आले आहेत. 80 वर्षांच्यापेक्षा अधिक काळ हे सर्व फोटो लिफाफ्यामध्ये बंद होते, असा दावा करण्यात आला आहे. त्याची कारणे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. 2015 मध्ये हे फोटो 2015 मध्ये चीनमध्ये गार्जियन स्प्रिंग लिलावात सादर केले जाणार असल्याचे सांगण्यात आलेे आहे.

(पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन िदवसांच्या चीन दौ-यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्ही जुन्या चीनची आठवण करून देणार आहोत.)

ल्योन 1930 च्या दशकातील वृत्तसंस्था असोसिएट प्रेसच्या वतीने चँग ह्वे लियांगमध्ये प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करत होते. सध्याचा चीन पाहता 80 वर्षांपूर्वी तेथील चित्र कसे होते याचा अंदाज लावणेही अवघड आहे. पण आम्ही आज तुम्हाला ते दाखवणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 1930 च्या चीनचे PHOTO'S