आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाचा अविष्कार: वॉशिंग्टनमधील बेटावर बर्फापासून बनलीत सुंदर लेणी, पाहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- वॉशिंग्टनपासून काही अंतरावर असलेले अपॉझल बेट बर्फापासून तयार झालेल्या लेणीसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात नोव्हेंबर ते मार्च दरम्यान खासकरून जानेवारी जेव्हा प्रचंड थंडी पडते तेव्हा येथे अशी दृश्ये दिसून येतात. जानेवारीत येथे बर्फाच्या मोठं मोठ्या लाद्या दिसून येतात. येथे जाण्यासाठी एक नदी ओलांडावी लागते. ती पूर्णपणे गोठलेली असते. अमेरिकी छायाचित्रकार अॅर्नी वाटेर यांनी सांगितले, येथे जाण्यासाठी मी सदैव तयार असतो. येथील सुंदर जागेत एक प्रकारची शांतता आढळते. थंडीच्या दिवसात येथे सूर्याची किरणे खूप कमी दिसून येतात. यासाठीच हे छायाचित्र टिपण्याची गरज होती.
 
- अपॉझल बेट 21 छोट्या बेटाचा एक समूह आहे. याच्या किनाऱ्याचे एकूण क्षेत्रफळ 69 हजार 372 एकर इतके आहे. येथे ऐतिहासिक लाईटहाऊस आणि वाळूच्या दगडपासून बनलेली लेणी आहेत.
 
पुढे पाहा, अपॉझल बेटावर बर्फापासून तयार झालेल्या लेणीची अप्रतिम छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...