आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने माघार घेतली नाही तर युद्ध अटळ: चीन; भारत सार्वभौमत्वावर गदा आणत असल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- डोकलाम येथे भारताने अतिक्रमण केले तर युद्ध होण्याचीही शक्यता आहे, असा इशारा चीनने दिला आहे. भारताने द्विपक्षीय करार विसरता कामा नये. चीनच्या राजकीय ध्येयासाठी हा मार्ग धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. येथून भारताने आपली सैन्यदले त्वरित माघारी घ्यावीत, असे चीनने म्हटले आहे. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, या मुद्द्यावर चीन सतत संबंधित राष्ट्रांच्या संपर्कात आहे. बीजिंगमधील भारतीय दूतावासाशीदेखील चीन बोलत आहे. मात्र, याविषयी सविस्तर वृत्त देण्यास सरकारने नकार दिला. भारतीय सैन्याने अनाठायी हस्तक्षेप केल्याबद्दल इतर देशांच्या राजदूतांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हे खरे आहे का, याविषयी विचारणा होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी म्हटले आहे. चीन आरेखित सीमेमध्ये काम करत असताना भारतीय सैन्याचे अतिक्रमण खटकणारे असल्याचे माध्यमांशी बोलताना लू म्हणाले.  

विविध देशांच्या राजदूतांनी याविषयी विचारणा केली असून चीन अचूक माहिती देत असल्याचे कांग म्हणाले.  भूतानजवळच्या रस्त्याविषयी गेल्या आठवड्यात चीनने भूमिका स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. येथे चीनच्या रस्ते बांधणीला भारतीय सैन्याने विरोध केला. हा मुद्दा महिनाभरापासून अनिर्णीत आहे. चिनी सैन्याला ईशान्य भारतात घुसखोरी करण्याची सोय या रस्त्यामुळे होईल, अशी भूमिका भारताने घेतली आहे. 
बातम्या आणखी आहेत...