आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांपासून बांधुन ठेवले आहे या मुलाला, कुटुंबाने सांगितली ही कारणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिनमध्‍ये एक प्रकरण सध्‍या फार चर्चेत आहे. एन्‍हूईमधील हेफेई या ठिकाणी एका 17 वर्षांच्‍या मुलाला मागील 10 वर्षांपासून बांधुन ठेवले आहे. त्‍यामुळे हा मुलगा अक्षरश: अपंगासारखे जीवन जगत आहे. 

असे आहे पूर्ण प्रकरण 
- एका वेबसाईटनूसार, 17 वर्षांचा यांग जी हा मानसिक रुग्‍ण आहे. तो आपले आजोबा, एक काकू आणि दोन छोट्या भावांसोबत राहतो. 
- यांगच्‍या पालकांनी सांगितले आहे की,  त्‍याची वागणुक लहानपणापासूनच विचित्र होती. तो अचानक एकटाच कुठेतरी निघून जायचा. आमच्‍याजवळ इतके पैसेही नव्‍हते की, आम्‍ही एखाद्या चांगल्‍या डॉक्‍टरची मदत घेऊ शकू. यामुळे नाईलाजाने आम्‍हाला त्‍याला बांधुन ठेवावे लागते. 
- यांगच्‍या आजोबांनी सांगितले आहे की, 'मागील 10 वर्षांपासून आम्‍ही यांगला बांधुन ठेवले आहे. असे करणे आमची मजबुरी आहे. सुरुवातीला आम्‍हाला वाटले की हळूहळू तो सुधारेल. मात्र आजही त्‍याच्‍या स्थितीत फरक पडलेला नाही. मागील वर्षी आम्‍ही त्‍याला बदक आणि कोंबड्यासोबत खेळताना आणि खाताना पाहिले होते.'
-  सध्‍या यांगच्‍या मदतीला कोणीही समोर आलेले नाही. मात्र तो चर्चेत आल्‍यामुळे नक्‍कीच काहीतरी होईल अशी त्‍याच्‍या कुटुंबाला आशा आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, यांगचे फोटोज... 
 
बातम्या आणखी आहेत...