आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिन्हुआ (चीन) - चीनमधील चिन्हुआ प्रांतातील ‘च्ययान’ गावात ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी चिन्हुआ म्युनिसिपल पीपल्स गव्हर्नमेंट यांच्या वतीने ‘होमस्टे प्रकल्प’ आयोजित करण्यात आला आहे. या प्रकल्पात भारतीयांसोबतच जर्मनी, फ्रान्स, रशिया, स्वित्झर्लंड, बल्गेरिया, इस्रायल, दक्षिण आफ्रिका, पोलंड या ४५ देशांतील २५ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. त्यांनी सोमवारी साेमवारी भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. या वेळी सर्वांनी भारतीय राष्ट्रगीत गाऊन तिरंगा राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

या वेळी भारतीय सहभागींनी गांधी टाेपी व पारंपरिक वेशभूषा केली होती. त्याचे विदेशी सहकाऱ्यांना आकर्षण वाटले. भारतामध्ये कशा प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो याबाबतची माहितीही त्यांनी भारतीयांकडून करून घेतली.

चिन्हुआ होमस्टे प्रकल्प : चिन्हुआ प्रांतातील वेगवेगळी गावे विकसित करण्यासाठी ‘होमस्टे’ या नावाने प्रकल्प सुरू आहे. ग्रामीण पर्यटनाला चालना देणे हा त्याचा उद्देश आहे. या माध्यमातूनच विविध देशांतील पर्यटकांना आकर्षित करून त्यांची ग्रामीण भागातील घरांत निवासाची सोय केली जाते. चीनमधील परंपरेशी आणि स्थानिक लोकांच्या जीवनमानाची ओळखही या निमित्ताने करून दिली जाते.

पुणे - चिन्हुआ मैत्री करार
पुणे आणि चीनमधील चिन्हुआ या दोन मोठ्या शहरांमध्ये सांस्कृतिक देवाण–घेवाण व्हावी या दृष्टिकोनातून मैत्री करार करण्याचे ठरवले आहे. सांस्कृतिक शहर, विद्येचे माहेरघर, आयटी हब म्हणून पुण्याची ओळख आहे. त्याचप्रमाणे चीनमधील सांस्कृतिक शहर म्हणून चिन्हुआचा लौकिक आहे. येथील एका शिष्टमंडळाने नुकतीच पुणे महापालिकेला भेट देऊन मैत्री कराराचा प्रस्ताव मांडला आहे. त्या दृष्टीने ‘होमस्टे प्रकल्पा’या १४ दिवसांच्या प्रकल्पात २० भारतीयांना सहभाग करून घेण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...