आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WAR 1962: तयारीनिशी युद्धात उतरला होता चीन, भारतीय सैन्‍याकडे उबदार कपडेही नव्‍हते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
20 ऑक्‍टोबर 1962 या दिवशी चीनने लडाख क्षेत्रात लष्‍करी आक्रमणाला सुरूवात केली होती. सीमावादातून भारत आणि चीनमध्‍ये पेटलेले युद्ध हे जवळजवळ महिनाभर सुरू राहिले. 20 नोव्‍हेंबरला अचानक चीनने एकतर्फी युद्धविरामाची घोषणा केली. पुर्ण तयारीने रणांगणात उतरलेले चीन तेव्‍हाही ताकदवान होते. त्‍यातुलनेत आपल्या सेनेकडे शस्त्रास्त्रे, सराव आणि प्रशिक्षणाचा अभाव होता. परिणामी भारताला या युद्धात पराभव पत्‍करावा लागला.

असा झाला सीमावादाचा स्‍फोट
चीनने तिबेटवर ताबा घेतला तेव्‍हापासून चीन-भारत यांच्यातील सीमावादाचा प्रश्‍न निर्माण झाला नि हा वाद वाढत गेला. मॅकमेहान या ब्रिटीश अधिकार्‍याने आखलेली सीमारेषा ही तिबेट भारत सीमारेषा आहे. याचा वादाचा स्‍फोट म्‍हणजे 20 ऑक्‍टोबर 1962 चे युद्ध समजले जाते. चीनला तोंड देणे भारतीय सेनेच्‍या शक्‍तीपलीकडचे झाले होते. तेव्‍हा राजकारणी व सनदी अधिकारी हे सैनिकांचे प्रश्‍न किंवा त्‍यांच्‍या ज्ञानाचा तंत्रज्ञानाचा फार विचार करत नसत. या अज्ञानामुळे ते राजकीय निर्णय घेताना सैनिकना विचारात घेत नसत. त्यामुळेच या सीमायुद्धात भारताला पराभव स्‍विकारावा लागला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, भारत चीन युद्धाशी संबंधित काही खास बाबी....