आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासागरातील खोदकाम, भारताने साथ द्यायला हवी - चीनचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी चीनने हिंद महासागराच्या तळाचे खोदकाम दोन्ही देशांनी एकत्र करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. खोदकामासाठी लागणारा मोठा निधी तसेच यातील धोके व फायद्याची समान भागीदारी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
चायना डेलीमध्ये गुरुवारी प्रकाशित अहवालानुसार, सागरी पृष्ठभागाचे खोदकाम आणि त्याच्या विकासासाठी स्थापन अधिकृत संघटना चीन ओशन मिनरल रिसोर्स असोसिएशनचे उपसंचालक ही जोंग्यू यांनी सांगितले की, चीन आणि भारत दोघेही इंटरनॅशनल सीबेड अॅथॉरिटीचे(आयएसए) नोंदणी कंत्राटदार आहेत. आपणामध्ये बरेच साधर्म्य आहे.
आपल्यासमोर परस्पर सहकार्याच्या चांगल्या संधी आहेत. सागरी तळाच्या खोदकामात खूप जोखीम उचलावी लागते आणि त्यासाठी मोठी गुंतवणूकही लागते. एका ठिकाणी खोदकाम करण्यासाठी साधारण ६० अब्ज कोटी डॉलर खर्च येतो, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
चीनच्या प्रादेशिक सागरी प्रशासनाचे उपसंचालक चेन लियानजेंग यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि चीनने समुद्राच्या खोदकामात समान पद्धतीने विकास केला आहे. त्यामुळे ते आदर्श भागीदार होऊ शकतात. चेन २० एप्रिल रोजी भारताच्या दौऱ्यावर आले होते. चीनने आयएसएसोबत २०११ मध्ये आग्नेय हिंद महासागराच्या १० हजार किमी क्षेत्रात पॉलिमेटलिक सल्फाइडचा शोध घेण्यासाठी करार केला होता. त्यांनी प्रशांत सागरातील संशोधनासाठीही दोन करार केले होते. मात्र, त्यांना हिंद महासागरातील खोदकामादरम्यान मिळणाऱ्या नव्या वस्तू जास्त आकर्षित करत आहेत.

पाणबुडी अभियानातून अनेक संशोधन
चीनची पाणबुडी जियाओलाँगने मार्चमध्ये हिंद महासागरातील ११८ दिवसांपासूनची मोहीम समाप्त केली आहे. त्यांनी या अभियानादरम्यान अनेक हायड्रोथर्मल वेंट्र डीप सी फिशर्स आदींचा शोध घेतला हेाता. हायड्रोथर्मल वेंटमधून समुद्रात गरम पाणी निघते. या शोधातून सागरी तळांचे स्रोत आणि सल्फाइडच्या भांडाराच्या शोधात मदत मिळू शकेल. सल्फाइडच्या भांडारातून अनेक प्रकारचे धातू मिळतात.