आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अझरवरील बंदीसाठी भारताने ‘पुरावा’ द्यावा, चीनचा पवित्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अझरवर बंदी घालण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रासमोर ठोस पुरावा सादर केला पाहिजे, अशा शब्दांत चीनने आपला आडमुठेपणा सुरू ठेवला आहे. २२ फेब्रुवारी रोजी भारत-चीन यांच्या सचिवस्तरीय बैठकीच्या तोंडावर हा पवित्रा घेण्यात आला आहे.  

आगामी बैठकीत दोन्ही देश सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीबाबत चर्चा करतील. त्याचबरोबर जागतिक तसेच द्विपक्षीय मुद्द्यांवरही उभय देशांच्या सचिवांत विचार-विनिमय होणार आहे. द्विपक्षीय संबंधातील मतभेदाच्या प्रश्नावर ही चर्चा अपेक्षित आहे. त्यात अझरवरील बंदी, अणु पुरवठादार गटातील सहभागाचा मुद्दाही चर्चेत येऊ शकेल, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शाँग यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
 
अझर हा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी भारताने लावून धरली आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीसमोर अनेक दिवसांपासून पडून आहे. चीनने त्यावर तांत्रिकदृष्ट्या आक्षेप नोंदवला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी भारताने यासंबंधीचा अर्ज दाखल केला होता. त्यावर पहिल्यांदा चीनने आक्षेप घेतला होता. अझर दहशतवादी असल्याचे ठोस पुरावे दिल्या गेले नसल्यामुळे त्याच्यावर बंदी घालणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरणार आहे.  
 
पुरावा नसल्याचा दावा  
भारताच्या मागणी संदर्भातील प्रस्तावावर सहमती होऊ शकत नाही. कारण अझरवर बंदी घालण्यासाठी ठोस पुरावा नाही. भारताने अद्याप सादर केलेला नाही, परंतु तसा पुरावा सादर करण्यात आला तर हा प्रस्ताव मान्य केला जाऊ शकतो. खरे तर चीनने नेहमीच उच्च व्यावसायिक मूल्यांची जपणूक केली आहे, असा दावा चीनने आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ केला आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...