हांगझोऊ - जी-20 देशांच्या फोटो सेशनमध्ये जगाला भारताची ताकद दिसली. बीजिंगच्या रेनमिन विद्यापीठाचे प्राध्यापक वांग यांनी जगातील 36 शक्तिशाली नेत्यांच्या या फोटोचे विश्लेषण केले आहे. यात 21 देशांचे राष्ट्राध्यक्ष, 8 अभ्यागत देशांचे प्रमुख आणि सात आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी आहेत. वांग यांच्यामते, चीनने प्रत्येक नेत्याच्या महत्त्वानुसार जागा दिली आहे. पहिल्या रांगेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागा चीनच्या नजरेत त्यांचा प्रभाव व देशाची ताकद दाखवते. 2002 नंतर पहिल्यांदा भारताला पहिल्या रांगेत जागा मिळाली आहे. यापूर्वी 2015 मध्ये तुर्कस्तानमध्ये पार पडलेल्या परिषदेत मोदी दुस-या रांगेत होते, तर 2012 मध्ये मेक्सिकोच्या जी-20 परिषदेत मनमोहन सिंगही दुस-या रांगेत उभे होते. पहिल्या रांगेत राष्ट्रपती आणि राजा, पुन्हा पंतप्रधान आणि चान्सलर...
- पहिल्या रांगेत मोदींसोबत 13 नेते होते. यात 11 राष्ट्रप्रमुखही होते. याच रांगेत जर्मनीच्या चान्सलर मर्केल आणि तुर्कस्तानचे राष्ट्रपतीही उभे होते.
- यातून हे दिसते की भारताकडे चीन कोणत्या नजरेतून पाहतोय आणि तो भारत उगवती आर्थिक शक्ती असल्याचे मान्य करतो.
- आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये पहिल्या रांगेत राष्ट्रपती व राजांना जागा दिली जाते. पुन्हा पंतप्रधान, चान्सलर आणि आंतराष्ट्रीय संस्थांना जागा दिली जाते.
- प्रत्येक रांगेत नेत्यांच्या मध्यापासून कोप-यापर्यंत त्यांच्या कार्यकाळाप्रमाणे जागा दिली जाते.
अशी आहे पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांची स्थिती
#1.भारत
नरेंद्र मोदी- पंतप्रधान
जीडीपी- 2,288.7
विकास दर- 7.5
लोकसंख्या - 125 कोटी
#2. अर्जेंटीना
मॉरीशियो मॅक्री- राष्ट्रपती
जीडीपी- 437.9
विकास दर- 1.0
लोकसंख्या - 4 कोटी
#3. दक्षिण कोरिया
पार्क गुन हे- राष्ट्रपती
जीडीपी- 1,321.2
विकास दर- 2.7
लोकसंख्या - 5 कोटी
#4. फ्रांस
फ्रांस्वा ओलांद- राष्ट्रपती
जीडीपी- 2,464.8
विकास दर- 1.1
लोकसंख्या - 6.6 कोटी
#5. रशिया
व्लादिमीर पुतिन- राष्ट्रपती
जीडीपी- 1,132.7
विकास दर- 1.8
लोकसंख्या - 14.3 कोटी
#6. तुर्कस्तान
रेचेप तय्यप एर्दोगन- राष्ट्रपती
जीडीपी- 751.2
विकास दर- 3.8
लोकसंख्या - 7.49 कोटी
#7. चीन
शी जिंगपिंग- राष्ट्रपती
जीडीपी- 11,383.0
विकास दर- 6.5
लोकसंख्या - 155 कोटी
#8. जर्मनी
अँगेला मर्केल- चान्सलर
जीडीपी- 3,467.8
विकास दर- 1.5
लोकसंख्या - 8 कोटी
#9. अमेरिका
बराक ओबामा- अध्यक्ष
जीडीपी- 18,558.1
विकास दर- 2.4
लोकसंख्या - 31.8 कोटी
(जीडीपी अब्ज डॉलरमध्ये आणि विकास दर टक्क्यांमध्ये)
जी-20 म्हणजे काय?
जी-20 म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. यात जगातील 19 शक्तिशाली देश आणि युरोपियन संघांचा समावेश होतो. 1999 मध्ये स्थापन झालेला हा ग्रुप जगातील 85 टक्के अर्थव्यवस्था व 75 टक्के जागतिक व्यापारावर नियंत्रण आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पहिल्या रांगेत उभ्या इतर 4 देशांच्या स्थितीविषयी...