आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोकलाम वादावेळी चीनकडून युद्धसरावाचे फक्त नाटकच मात्र प्रचार जोरात: एक्सपर्ट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोकलाम वादादरम्यान चीनने युद्धाचा सराव करत असल्याचे नाटक केले व त्याचा प्रचार केला असे वेस्टर्न मिलिट्री तज्ञांचे म्हणणे आहे. - Divya Marathi
डोकलाम वादादरम्यान चीनने युद्धाचा सराव करत असल्याचे नाटक केले व त्याचा प्रचार केला असे वेस्टर्न मिलिट्री तज्ञांचे म्हणणे आहे.
हाँगकाँग/नवी दिल्ली- भारत आणि चीन यांच्यात मागील महिन्यात डोकलामचा जो काही वाद झाला त्या दरम्यान चीनने तिबेट आणि हिंद महासागरात जे लाईव्ह फायर ड्रिल केले ते फक्त नाटक किंवा भीती दाखविण्याचा भाग होता, असे तज्ञांचे म्हणणे आहे. चीनची आर्मी PLA (पीपुल्स लिबरेशन आर्मी) वर नजर राखणा-या वेस्टर्न मिलिट्री एक्सपर्ट्सचे हे म्हणणे आहे. बीजिंगच्या सरकारी मीडियाच्या माहितीनुसार, PLA ने नुकतेच हे ड्रिल केले होते. चीनी सैनिकांनी मोकळ्या काडतूसांचा केला वापर....
 
- न्यूज एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार, वेस्टर्न मिलिट्री एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, तिबेट आटोनॉमस रीजन (TAR) आणि हिंद महासागर ( Indian Ocean) च्या पश्चिम भागात झालेल्या एक्सरसाईज दरम्यान चीनी सैनिकांनी मोकळ्या काडतूसांचा वापर केला होता. या ड्रिलद्वारे भारतावर दबाव बनविण्याचा डाव चीनचा होता. सैनिकांचे हे लाईव्ह फायर ड्रिलला चीन सरकारला भीती दाखविण्याचे एक हत्यार म्हणून दाखवायचे होते. 
- आपल्याला माहित असेलच की, ड्रिलच्या या वृत्ताला चीनची सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्स, चायना सेंट्रल टेलीविजन आणि न्यूज एजन्सी शिन्हुआने ठळक स्थान दिले होते. 
 
भारत भिडला होता चीनला- 
 
- एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, चीनी मीडियाला वाटत होते की भारताने डोकलाममध्ये चीनच्या कामात हस्तक्षेप केल्याने त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. 
- "तिबेट आटोनॉमस रीजनमधील तथाकथित ड्रिलच्या विश्लेषनानंतर हे स्पष्ट झाले की चीनच्या अव्यावारिक भूमिकेमुळे 'कट अॅंड पेस्ट' सारख्या स्थितीलाच चीन मागील अनेक वर्षे काम करत आहे. तिबेटमध्ये दाखवलेली शस्त्रे, मिसाईल आणि त्याची लाँच पोजिशन वास्तवात तिबेटमध्ये तैनात क्षेपणास्त्रांशी मिळतीजुळती नव्हती."
- याद्वारे विदेशातील संरक्षण क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे, चीनला केवळ भारताला भीती दाखवायची होती. जेणेकरून भारत दबावाला बळी पडेल व डोकलामप्रकणी बोलणी सुरु करेल. मात्र असे काहीही घडले नाही. उलट चीनलाच एक पाऊल मागे घ्यावे लागले. या प्रकरणात भारताने शांत राहून आपला नैतिक विजय मिळवला.
बातम्या आणखी आहेत...