आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादाच्या संशयावरून अटक केलेल्या भारतीयासह 20 जणांची सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून उत्तर चीनमध्ये
अटक केलेल्या 20 पर्यटकांना शुक्रवारी रात्री अखेर सुटका झाली. त्यात एक भारतीय नागरिक आहे. राजीव मोहन कुलश्रेष्‍ठ (वय 46) असे या भारतीय व्यक्तिचे नाव आहे. राजीव कुलश्रेष्ठ हे एक व्यावसायिक असून दिल्लीचे रहिवासी आहेत. बीजिंग येथील भारतीय दुतावासाने कुलश्रेष्ठ यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले.

दरम्यान, राजीव कुलश्रेष्ठ यांच्यासह 19 विदेशी पर्यटकांना 10 जुलैला उत्तर चीनमध्ये अटक केले होते. यात‍ पाच दक्षिण आफ्रिका आणि तीन ब्रिटिश पर्यटकांचा समावेश होता. 20 पर्यटकांचा हा ग्रुप 47 दिवसांच्या सहलीवर अाले होते. दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून चीनच्या पोलिसांनी सगळ्यांना अटक केले होते. इनर मंगोलियातील ओरदोस येथील एका हॉटेलच्या खोलीत बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांचे व्हिडिओ पाहात असताना सगळ्यांना अटक करण्‍यात आले होते.