आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संक्रमित डासांकडूनच आजार फैलावणाऱ्या डासांचा विनाश, चीनच्या विद्यापीठात यशस्वी प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुआंगझाओ - जगात कदाचित असा एखादाच देश असेल, जो डासांद्वारे पसरत असलेल्या आजारामुळे त्रस्त नाही. पण चीनने आजार पसरवणाऱ्या डासांविरुद्ध रीतसर लढाई छेडली आहे. दक्षिण चीनच्या गुआंगझाओमध्ये दर आठवड्याला संशोधक ३० लाख जिवाणूंनी संक्रमित डास ३ किलोमीटर पसरलेल्या बेटावर सोडत आहेत, जेणेकरून डेंग्यू, झिका आणि पिवळा तापसारख्या आजारांवर नियंत्रण मिळविता यावे वा हे आजार कमी व्हावेत.

यासाठी विज्ञान प्रयोगशाळेत संशोधक शास्त्रज्ञ काही विशेष प्रयोग करत आहेत. यादरम्यान डासांच्या अंड्यातील वोल्बेशिया नावाच्या जिवाणूला त्यांच्यात टोचले (इंजेक्ट) केले जात आहे. यानंतर डासांना निघताच हवेत सोडले जात आहे. सन-येत-सेन विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली हा प्रयोग केला जात आहे. टीमचे मुख्य शास्त्रज्ञ झियोंग शी सांगतात की, या प्रयोगाचा उद्देश त्या डासांची संख्या कमी करणे आहे, जे आजाराच्या जीवाणूस पसरवत आहेत. हे जीवाणू २८ टक्के जंगली डासांच्या नैसर्गिक स्वरूपातून मिळतात. याच कारणाने संक्रमित डास जेव्हा मादी डासांशी मिळतात तेव्हा त्यांच्यापर्यंत आजाराला पोहोचवू शकत नाहीत. शी यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रयोग त्या ठिकाणांवर सुरू केला आहे, जेथे हे आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. प्रयोगानंतर या ठिकाणी आश्चर्यकारकरीत्या आजार पसरणे कमी झाले आहे. शी सांगतात की, जगभरात दरवर्षी दहा लाख मृत्यू या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमुळे होताहेत. यात सर्वात धोकादायक विषाणू आजार हा झिका व्हायरस (विषाणू)चा आहे, जो येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक खेळात भाग घेणाऱ्या अॅथलिट्ससाठी एक चिंतेचा विषय झाला आहे. काही अॅथलिट्सनी तर खेळात भाग घेण्यासच नकार दिलेला आहे. अशातच या आजारावर नियंत्रण मिळविणे अधिक आवश्यक होऊन बसले आहे.
अमेरिकी आरोग्याधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला आहे की, झिका व्हायरसमुळे गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका आहे. गर्भस्थ शिशूस मायक्रोसेफेलीचा धोका अधिक असतो. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तेच डब्लूएचओच्या अनुसार झिका आजाराच्या या पार्श्वभूमीवर गुईलायन-बर्रे या आजारापासून नर्व्ह नसांना प्रभावित करणारा सिंड्रोम होतो, जो वयस्क पुरुषांमध्ये तात्पुरता लकवादेखील येऊ शकतो.
शी सांगताहेत की, त्यांच्या या प्रयोगाने ब्राझील आणि मेक्सिकोसह अनेक देशांनीदेखील रुची दाखवली आहे. आम्ही या प्रयोगासाठी लॅबमध्ये (प्रयोगशाळेत) ५ हजार मादी आणि १६०० नर डासांच्या प्रजननातून मिळालेल्या अंड्यांमध्ये वोल्बेशिया नामक जीवाणू (बॅक्टेरिया) टोचत (इंजेक्ट) करत आहेत,0 ज्यामुळे ५० लाख संक्रमित डास दर आठवड्याला तयार होत आहेत. मादी डास या जीवाणूने ग्रस्त होते तेव्हा ती प्रजननानंतर त्याच प्रकारचे अंडेदेखील देते, ज्यामुळे निर्माण झालेले डास आजार पसरवण्यास मुळी सक्षमच नसतात. शी यांनी ३८ हजार वर्गफुटात आपली प्रयोगशाळा २०१२ मध्ये स्थापन केली होती. तेव्हापासूनच ते यावर संशोधन करत आहेत. त्यांनी आणखी दोन भागात हे डास सोडले आहेत. येथे डासांच्या संख्येत ९० टक्के घट झाली आहे. स्थानिक लोकांनीदेखील ही वस्तुस्थिती स्वीकारली आहे की, डास कमी झाले आहेत. शी सांगतात की, प्रारंभी लोक असे प्रयोग केलेले संक्रमित डास सोडण्यास मना करत असत. त्यांचा तर्क असे की, यामुळे अजून डास वाढतील. पण आता या प्रयोगानंतर ते निश्चिंत झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...