आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला धडा शिकविण्यासाठी आर्मी नव्हे, भारताकडे हे आहे सर्वात मोठे हत्यार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या घडीला भारताकडे चीनविरूद्ध वापरायचे झाल्यास व्यापार हेच सर्वात मोठे हत्यार आहे. - Divya Marathi
सध्याच्या घडीला भारताकडे चीनविरूद्ध वापरायचे झाल्यास व्यापार हेच सर्वात मोठे हत्यार आहे.
इंटरनॅशनल डेस्क- भारत आणि चीन यांच्यातील सिक्किम वादानंतर चीनी वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. व्यापाराच्या दृष्टीने बघायला गेले भारत चीनचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. चीनमधून भारत दरवर्षी सुमारे 58.33 बिलियन डॉलरची आयात करतो, जो आकडा खूपच मोठा आहे. सध्याच्या घडीला भारताकडे चीनविरूद्ध वापरायचे झाल्यास हेच सर्वात मोठे हत्यार आहे. चीनने तर आता थेट युद्धाचीच धमकी दिली आहे. त्यामुळे भारतीय जनतेतून चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी बुलंद होऊ शकते व त्यामुळे चीनचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा वेळी चीन आपला मोठा व्यापार गमावू इच्छित नसेल. भारतातील निम्मा बाजारावर चीनचा ताबा....
 
- चीन भारताचा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे. यात भारताचा निम्मा बाजार त्यांच्या ताब्यात आहे. जीएसीच्या माहितीनुसार, दोन्ही देशांत 2016 मध्ये 70.8 बिलियन डॉलरचा व्यापार झाला. यात चीनने भारतात 58.33 बिलियन डॉलरचे साहित्य निर्यात केले तर, भारताने फक्त 12.47 बिलियन डॉलरचे सामान चीनला निर्यात केले. 
 
येथे सर्वकाही चायना मेड-
 
भारतात लहान मुलांच्या खेळण्यापासून ते बोट, मशीन आणि मेडिसिनपर्यंत चीनने घुसखोरी केली आहे. दिवाळीतील फटाके असो की, लाईट्स की, दिवे, होळीच्या पिचकारी सर्व काही चीन भारतात निर्यात करत आहे. अर्थात याची किंमत भारतातील वस्तूपेक्षा कमी आहे शिवाय दर्जाही बरा आहे. त्यामुळे भारतीय लोक ती खरेदी करणे पसंत करतात. त्याचमुळे चीनचा सामान भारतात मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.
 
भारतात या सामानाची मोठी मागणी- 
 
- इलेक्ट्रॉनिक वस्तू
- मशिन्स, इंजिन, पंम्प
- रासायनिक औषधे, खते
- लोखंड, स्टील
- प्लॅस्टिकपासून बनणारे साहित्य
- किंमती धातू व शिक्के
- जहाजे, बोटी
- औषधे, वैद्यकीय उपकरणे 
 
चीनमध्ये मात्र जगातील कोणत्याही कंपनीला नाही दिले घुसू-
 
-चीन भारतासह संपूर्ण जगात आपला व्यवसाय पसरवत आहे. यासाठी युरोप, ऑफ्रिका, रशिया, पूर्व युरोप, गल्फ देश व दक्षिण आशियातील देशांत रेल्वे, बंदरे व विमानतळासारख्या पायाभूत सुविधा स्वत:च्याच पैशाने निर्माण करत आहे.
- चीनने आपल्या देशात विविध कंपन्यांनाच नव्हे तर फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेजन, यूट्यूब सारख्या कंपनींनाही घुसू दिले नाही. 
- त्यांनी जागतिक कंपन्यांना चीनमध्ये बंदी घालत त्याला पर्यायी व्यवस्था काढली व लोकांच्या गरजा पूर्ण केल्या.
- जगभर जेथे ब्राउजर म्हणून क्रोमचा वापर होतो तर चीनने आपले यूसी ब्राउजर सादर केले. 
- चीनमध्येच नव्हे तर भारतातही यूसीने आपला जम बसविला आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, चीनने जागतिक कंपन्यांना कशी पर्यायी व्यवस्था उभी केली आहे...
बातम्या आणखी आहेत...