आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोकलामसारखे वाद रोखण्यासाठी चीनी लष्कर शिकणार हिंदी, चिमणीच्या आकारातील ड्रोनचे यशस्वी परीक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - भारताच्या सीमारेषेवर डोकलामसारखे वाद रोखण्यासाठी चीनच्या लष्कराने हिंदी भाषा शिकण्याची आवश्यकता आहे. ही सूचना इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल रिलेशनच्या शांघाई अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसच्या रिसर्च फेलो हू झियाँग यांनी केली आहे. झियाँग म्हणाले, की डोकलाम वादानंतर भारताने चीनबद्दल गैरसमज न होण्यासाठी लष्काराला मंदारिन भाषा शिकण्यास सांगितले आहे. झियाँगने सांगितले की, सीमारेषेवर तैनात असलेल्या जवानांना एकमेकांची भाषा अवगत असणे गरजेचे आहे.
 
झियाँगच्या मते, एकमेकांची भाषा, संस्कृती आणि परंपरा समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वाद कमी होऊन दोन्ही देशातील मैत्री घट्ट होईल. त्यापूर्वी भारताने आपल्या लष्कराला मंदारिन भाषा शिकणे अनिवार्य केले होते. ज्यामुळे सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना संवाद साधने सोपे होईल. 
 
चीनने केले गुप्तहेर ड्रोनचे परीक्षण
चीनने चिमणीच्या आकारातील एका ड्रोनचे परीक्षण केले आहे. हा ड्रोन आकाशात जाऊन गुप्तहेराचे काम करणार आहे. हा ड्रोन चीनी सैनिकांच्या अत्यंत उपयोगचा ठरणार आहे. हाँगकाँगमधून प्रकाशित होणाऱ्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने ही माहिती मंगळवारी दिली. यात म्हटले आहे की, मंगोलियामध्ये या ड्रोनचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. हा ड्रोन समुद्रसपाटीपासून आकाशात 25 किलोमीटर अंतरापर्यंत झेप घेऊ शकतो. 
बातम्या आणखी आहेत...