आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-चीन यांच्यात जर आज युद्ध झाले तर चीन वापरेल ही शस्त्रात्रे, क्षणात बिघडेल खेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- चीनने मंगळवारी पीपुल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)ची 90th अॅनिवर्सरी साजरी केली. चीनी आर्मीची स्थापना 1 ऑगस्ट, 1927 रोजी माओत्से तुंगच्या नेतृत्त्वाखाली नॅशनल लिबरेशन मूव्हमेंट दरम्यान झाली. या दिनी चीन दरवर्षी 1 ऑगस्टला आर्मी परेड काढतो. मिलिट्री बेस झूरिहे येथे काढण्यात आलेल्या या परेडमध्ये चीनचे 12 हजार ट्रूप्सने सहभाग घेतला. यात 129 एयरक्राफ्ट आणि 571 मिलिट्री इक्विपमेंट्सचे प्रदर्शन केले गेले. शॉर्ट, मीडियम आणि लॉन्ग रेंजपर्यंत टारगेट करणारे डोंगफेंग, अनेक रॉकेट्स, टॅंक्स आणि ड्रोन्सशिवाय न्यूक्लियर कॅपेबल बॅलिस्टिक मिसाईल सुद्धा परेडमध्ये नजरेस पडली.
 
पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराच्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगोलियाच्या वाळवंटातील झुरिह या लष्करी तळावर मोठे संचलन झाले. सिक्कीमच्या डोकलाममध्ये भारताशी तणातणी सुरू असतानाच चिनी लष्कराने रविवारी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लष्‍कराला युध्‍द जिंकण्‍यासाठी तयार राहण्‍याचे आदेश दिले. लष्करी गणवेशात सैन्याला संबोधित करताना राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्कराला युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले. ते म्हणाले की, पीएलए कोणत्याही हल्लेखोर शत्रूला हरवण्यास सक्षम आहे. जिनपिंग यांनी भारताचे नाव घेतले नाही. मात्र, चीनची सरकारी माध्यमे आणि प्रवक्ता भारतावर डोकलाममध्ये घुसखोरीचा आरोप करत आहेत. यानिमित्ताने आपण पाहणार आहोत जर आज भारत-चीन यांच्यात युद्ध झाले तर चीन कोणकोणती शस्त्रे वापरेल. चीनच्या भात्यात आज कोणती कोणती अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आहेत यावर आपण नजर टाकूया. ही शस्त्रे इतकी धोकादायक आहेत की काही सेकंदात होत्याचे नव्हते करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोणकोणती आधुनिक व धोकादायक शस्त्रे आहेत चीनकडे...
बातम्या आणखी आहेत...