आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

140 कोटी जनतेच्या देशात 200 लोक निवडतात राष्ट्राध्यक्ष, अशी आहे प्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) च्या 19 वी नॅशनल काँग्रेस 18 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. दर 5 वर्षांनी होणाऱ्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वात मोठ्या संमेलनावर साऱ्या जगाची नजर असते. यातच पक्ष आणि एकूण देशाचा नेता निवडला जातो. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश चीनच्या राष्ट्राध्यक्ष पदी पुन्हा शी जिनपिंग यांची निवड निश्चित मानली जात आहे.
 

अशी होते राष्ट्राध्यक्षाची निवड...
- ऑक्टोबरमध्ये सुरुवातीला कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) देशभर आपल्या प्रतिनिधींची निवड करणार आहे. यानंतर ग्रेट हॉलमध्ये सर्वात महत्वाची बैठक घेतली जाईल. 
- सीपीसीमध्ये एकूण 2300 प्रतिनिधी आहेत. मात्र, या वर्षी त्यापैकी 2287 प्रतिनिधी काँग्रेसमध्ये (सभेत) सहभागी होणार आहेत. 13 प्रतिनिधींना गैरवर्तनामुळे पक्षातून काढण्यात आले आहे. 
- बंद दरवाज्यात सीपीसीची केंद्रीय समितीची निवड पार पडते. यात 200 सदस्य सहभागी होतात. सेंट्रल कमिटी पक्षाची एक राजकीय संस्था आहे. त्यामध्ये महत्वाचे नेतेच सहभाग घेतात. 
- सेंट्रल कमिटीच पॉलिट ब्युरो सदस्यांची निवड करते. पॉलिटब्युरो 25 सदस्यांची एक महत्वाची शाखा आहे. तर पॉलिट ब्युरोचे सदस्य स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करते. त्यामध्ये 7 सदस्यांचा समावेश असतो. 
- सेंट्रल कमिटीकडून निवडल्या जाणाऱ्या या दोन संस्थाच निर्णय घेणाऱ्या सर्वात महत्वाच्या संस्था आहेत. सेंट्रल कमिटीकडूनच देशाच्या आणि पक्षाच्या नेत्याची निवड केली जाते. 
 
पार्टी जनरल सेक्रेटरी बनतो प्रेसिंडेट
चीनमध्ये एक पक्षीय (लोकशाही) शासन पद्धती आहे. कम्युनिस्ट पार्टीच सरकार स्थापित करते. या पक्षाच्या जनरल सेक्रेटरी पदी ज्याची निवड केली जाते तोच देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतो. मंत्री आणि अधिकारी हे पक्षाचेच पदाधिकारी असतात. 
 
 
पुढील स्लाइड्सवर आणखी तपशीलवार जाणून घ्या...
बातम्या आणखी आहेत...