सेऊल - उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात प्रचंड संघर्ष आहे. अमेरिकेला दक्षिण कोरिया व त्यांची गुप्तचर संस्था मदत करत असल्याचे उत्तर कोरियाचे म्हणणे आहे. उत्तर कोरिया व दक्षिण कोरियात भारत-पाकसारखेच शत्रूत्त्व आहे. उत्तर कोरिया दक्षिण कोरियावर सीमेवरील भागात त्रास देत असल्याचा आरोप करत असला तरी हा देश मानवी हक्कांची होत असलेल्या मोडतोडीसाठी जगात बदनाम आहे. येथील लेबर कॅम्पमध्ये कैद्यांसोबत अमानवी वर्तन केले जाते. सरडे, उंदीर, साप खावे लागतात कैद्यांना...
- जर कुटुंबातील एखाद्या सदस्यानेही गुन्हा केला असेल, तर त्याच्या तीन पिढ्यांना आजीवन तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागते.
- 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयोगाने लेबर कॅम्प्समधून सुटून आलेल्या काही कैद्यांनी तुरुंगात दिल्या जाणा-या भयानक यातनांविषयी खुलासा केला.
- यात जड काम करायला लावणे, उपाशी ठेवणे, बलात्कार, फाशी व्यतिरिक्त महिला कैद्यांना जबरदस्तीने गर्भपात व मुलांचा निर्घृण हत्या करणे याचा समावेश होतो.
- अहवालानुसार, 2014 पर्यंत देशात जवळपास 1 लाख 20 हजार कैदी वेगवेगळ्या लेबर कॅम्प्समध्ये बंद होते.
- एका अंदाजानुसार, पाच दशकांत शेकडो राजकीय कैद्यांना मारण्यात आले.
दिवसभरात कैद्यांकडून 16 तास काम-
- येथील कॅम्प नरकापेक्षा कमी नाहीत. कैद्यांना दिवसाचे 14, 15 किंवा 16 तास काम करावे लागते.
- कैद्यांकडून फील्ड वर्क करुन घेण्यापासून जंगलात लाकूड कापणे, इतके नव्हेतर खाणींमध्ये जबरदस्तीने काम करुन घेतले जाते.
- 2009 च्या अहवालानुसार, लेबर कॅम्प्समध्ये कैद्यांना खाण्याच्या नावावर फक्त सडलेला मक्याच्या दाण्यांचे खारट सूप दिले जाते.
उंदीर, सरडे, सापही खायला तयार आहेत कैदी-
- 90 च्या दशकात येथे भयावह दुष्काळ पडला होता. तेव्हा खायला काही नव्हते. लाखो लोक विनाकारण मृत्यूमुखी पडले.
- शिन डॉंग ह्यूक, कॅशन शहरातील 'कॅम्प14' मध्ये जन्मली होती. खायला नसल्याने येथे तिने सरडे, साप आणि उंदरांपासून सरपटणारा प्रत्येक जीव खाल्ला होता.
- तिने सांगितले, कॅम्पमध्ये खूप उंदीर होते. त्यांना खाण्यासाठी कैद्यांचे एकमेंकांत लढत असे. मात्र उंदीर खाण्यासाठीही गार्ड्सची परवानगी घ्यावी लागत होती.
- जर कोणी न विचारता खाल्ल्यास, तर त्यांना बेदम मारले जात होते.
कैद्यांची आपबीती-
- महिला तुरुंगातून सुरक्षितपणे बाहेर आलेली जी हीऑन म्हणते, येथे नेहमी गरोदर महिला कैद्यांचे मुले गर्भातच मारली जातात. पण एकीने जिवंत बाळाला जन्म दिला. सर्व आनंदी होते. इतक्यात येथे गार्ड्स आला. मग आईच्या समोरच त्या नवजात बाळाला पाण्यात बुडून मारण्यात आले.
- शिन डॉन्ग ह्युकने सांगितले, मी तेव्हा पाच वर्षांची होते. लष्कराने एका व्यक्तीला लाकडी खांबाला बांधून नंतर गोळ्या झाडून हत्या केली.
- 'कॅम्प 15' मधील दहा वर्ष कैदेत राहिलेले कॅन्ग श्यॉल क्वान म्हणतात, गार्ड्सने जवळपास तीन हजार कैद्यांना दोन लोकांवर दगड मारायला सांगितले होते.
- यूएननुसार, किम जोंग दुसरा यांचा एक माजी गार्ड ली यंग कूकला कॅम्प-15 मध्ये दहा वर्ष शिक्षा सुनावली गेली होती.
- त्याने चीनमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला. ज्या रस्त्याने तो पळून गेला होता त्याला त्याच मार्गाने ट्रकच्या मागे बांधून ओढत आणले. यानंतर त्याला फाशी देण्यात आली.
पुढील स्लाईड्सवर पाहा, कशा पध्दतीने येथील कैद्यांचा छळ केला जातो...