आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सेक्स पॉवर\' वाढविण्यासाठी सेवन केली जाते \'टायगर वाईन\', मोजली जाते तगडी किंमत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजिंग- चीनमध्ये सेक्स पॉवर वाढवण्यासाठी 'टायगर वाइन' सेवन करण्‍याचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. वाघाची हाडे उकळून ही वाइन तयार केली जाते. टायगर वाइनच्या एका बाटलीसाठी येथील धनाढ्य मोठी किंमतही मोजायला सहज तयार होतात. एका इन्व्हेस्टीगेशन रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
 
- 'डेलीमेल' या न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, वाघांच्या दयनीय अवस्थेला चायना सरकार जबाबदार आहे. सरकारकडून खतपाणी मिळत असल्यामुळे हा गोरखधंदा खुलेआम सुरु आहे. वाइल्डलाइफ पार्क्समध्ये वाघांना अन्नपाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. परिणामी हजारांच्या संख्येने वाघांचा मृत्यू होत आहे. वाघांच्या हाडांपासून वाइन बनवण्याचा मल्टी बिलियन डॉलर बिझनेस उदयास आला आहे. मृत वाघांची हाडे गोळाकरून ती उकळून त्यापासून 'टायगर' ब्रँड नावाने वाइन बनवली जाते.
- 'टायगर वाइन'ची ऑनलाइन विक्री जोरात सुरु असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
- चीनमध्ये टायगर वाइनला 'हेल्थ टॉनिक'ही विक्र‍ी होताना दिसत आहे.
- धक्कादायक म्हटजे चीनमधील धनाढ्य एका बाटली 'टायगर वाइन'साठी 400 पाउंड (जवळपास 26 हजार रुपये) मोजण्यास तयार आहेत.
 
पुढे वाचा - वाघाच्या हाडांपासून अशी बनवली जाते मद्य...
 
बातम्या आणखी आहेत...