आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनबाबतचे धक्कादायक फॅक्ट्स, तुम्हाला याविषयी माहिती नसेलच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - सिक्कीमच्या डोकलाम परिसरात चीनच्या अनाधिकृत रस्ते विकास व बांधकामावरून भारत आणि चीनमध्ये वाद सुरू आहे. अशा वेळी चिनी मिडीया दररोज धमक्या देत आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिनहुआने भारताला धमकी देताना म्हटले आहे की, चीन डोकलाम परिसरावर कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. उलट भारताने सिक्कीममधून सैन्य हटवल्याशिवाय चर्चा अशक्य आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने वाद निवळण्यासाठी दोन्ही देशांत चर्चेचे आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर चिनी मीडियाने ही प्रतिक्रिया दिली आहे.
 
चीन तसेही नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरून वादात अडकत असतो. गेल्या वर्षी दक्षिण चिनी समुद्रावरील हक्काच्या सुनावणीत इंटरनॅशनल कोर्टाने चीनच्या विरोधात निर्णय दिला होता. या निकालानंतर सैरभैर झालेल्या चीनने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनच्या न्यायाधीशांना बाहेरील शक्तींचे कळसूत्री बाहुले असे म्हटले होते. आताही चीनच्या बहुतेक शेजारी राष्ट्रांशी कोणत्या कोणत्या कारणांवरून वाद सुरु आहेत. मग ते जपान असो, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम ते भारतासह तिबेट, तैवान अशी असंख्य उदाहरणे देता येतील. कम्युनिस्ट शासन असलेला हा देश नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो. अन्न, लोकसंख्‍या, प्रसिध्‍द ब्रँड्सची नक्कल आणि सेन्सॉरशीपसह अनेक असे मुद्दे आहेत ज्यामुळे हा देश बातम्यांमध्‍ये झळकत असतो.
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घेऊ या, असे अवाक् करणारे चीनविषयीचे फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...