Home | International | China | Underground Hotel Built In Shanghai Shows Off Luxury Sample Rooms

जमीनीच्या 100 फूट खोल तयार होत आहे हे हॉटेल, व्हायरल होताहेत PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 02, 2017, 01:06 PM IST

शांघाई - चीनमध्ये तयार होत असणाऱ्या शिमाओ वंडरलँड इंटरकॉन्टीनेंटल क्वेरी हॉटेलचे फोटो व्हायरल होत आहेत. या अल्ट्रा हायटे

 • Underground Hotel Built In Shanghai Shows Off Luxury Sample Rooms
  शांघाई - चीनमध्ये तयार होत असणाऱ्या शिमाओ वंडरलँड इंटरकॉन्टीनेंटल क्वेरी हॉटेलचे फोटो व्हायरल होत आहेत. या अल्ट्रा हायटेक हॉटेलमधील सॅम्पल रुमच्या आतील फोटो चर्चेत आहे. हे हॉटेल जमीनीपासून 100 मीटर खोलवर तयार होत आहे. या हॉटेलचे बांधकाम गेल्या पाच वर्षापासून निरंतर सुरु आहे. आतापर्यंत या हॉटेलचे मुलभूत स्ट्रक्चर तयार झालेले आहे. मात्र उर्वरीत काम वेगाने सुरु आहे.
  18 मजली हॉटेलमध्ये असतील 300 खोल्या...
  - हे हॉटेल शांघाईच्या सोंगजियांना जिल्ह्यात तयार होत आहे. हा प्रोजेक्ट एप्रिल 2012ला सुरु झाला होता. या हॉटेलचे संपूर्ण कामकाज 2014ला पूर्ण होणे अपेक्षीत होते.
  - मात्र या हॉटेलचे काम वाढतवाढत 2018ला पूर्ण होण्याची शक्यता आहे.
  - या हॉटेलमध्ये 18 मजले असून यापैकी दोन मजले जमीनीच्या वरती असतील. यामध्ये लॉबी आणि कॉन्फरन्स सेंटरचीही व्यवस्था असेल.
  - हॉटेलचा मुख्य भाग हा जमीनीच्या आत असेल. यामध्ये डायनिंग एरियासह एंटरटेनमेंटच्या सर्व सुविधा उपलब्ध असणार आहे.
  - हॉटेलचे दोन सर्वात खालचे मजले हे पाण्याखाली आहेत. या मजल्यावर सर्वाधिक आलिशान सुट आणि एक्झेक्युटिव्ह संकल्पनेवर आधारित रेस्टॉरंट असणार आहे.
  - प्रोजेक्टनुसार हॉटेलमधील सर्व 300 खोल्यांना स्वतंत्र बालकनी असेल. याठिकाणी गेस्ट 60 मीटर उंचीचा वॉटरफॉल पाहू शकतील.
  - डेव्हलपर्स हॉटेलच्या आसपास जंपिंग आणि रॉक क्लायंबिंगसारख्या स्पोर्ट सुविधा देण्याच्या विचारात आहेत.
  पुढील स्लाईडवर पाहा - या हॉटेलचे फोटो

Trending