Home »International »China» Zhang Shuili Of China Said Indian Drone Invaded China Airspace And Crashed

भारतीय ड्रोनच्या घुसखोरीचा चिनी लष्कराने केला निषेध; भारताने दिला चीनला संदेश

दिव्य मराठी वेब टीम | Dec 08, 2017, 08:04 AM IST

  • भारताने ड्रोनशी संपर्क तुटल्याचे म्हटले होते. (फाइल)

बीजिंग- भारताच्या अज्ञात यूएव्ही (अनमॅन्ड एरियल व्हेइकल) ने चीनच्या हद्दीत प्रवेश केल्याबद्दल चीन लष्कराने निषेध व्यक्त केला आहे. भारताचे ड्रोन गस्तीसाठी येथे आले असावे, असा संशय चीनने व्यक्त केला. चीनच्या सीमा सुरक्षा दलाने हे यान नष्ट केल्याची माहिती चीनच्या पश्चिम लष्कर दलाचे उपप्रमुख झांग शुईली यांनी दिली. मात्र, हे ड्रोन नेमके कुठे पाडले याचा तपशील त्यांनी दिलेला नाही.

तिबेटियन सीमेजवळ ड्रोन पाठवल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनच्या स्वायत्ततेमध्ये भारत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप शुईली यांनी चिनी माध्यमांशी बोलताना केला. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी रशिया-भारत-चीन (आरआयसी) त्रिपक्षीय चर्चेसाठी १० डिसेंबरला नवी दिल्लीत दाखल होतील. आता सीमेवर तणाव वाढला आहे.


तांत्रिक बिघाडामुळे यूएव्ही चीनच्या क्षेत्रात : भारत
नवी दिल्ली - अनमॅन्ड एरियल व्हेईकल (यूएव्ही) वरील तांत्रिक नियंत्रण सुटल्याने ते भरकटले. सिक्कीम सेक्टरमध्ये ही घटना घडल्याचे भारताने दिलेल्या खुलाशात सांगितले आहे. नियंत्रण कक्षाशी याचा संपर्क तुटला होता. संरक्षण मंत्रालयाने चीनच्या आरोपांचे खंडन करत आपली बाजू मांडली.

पुढील स्लाइड्सवर वाचा.. काय होता डोकलाम वाद?

Next Article

Recommended