आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्त्रायलच्या फिमेल सोल्जर्स सर्वात डेंजर्स, मात्र ड्यूटीवर अशा करतात एन्जॉय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- आपल्या पहिल्या विदेश दौ-यावर पोहचलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सोमवारी इस्त्रायल आणि मंगळवारी पॅलेस्टाईनला पोहचले. ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांची भेट घेतली आणि पत्रकार परिषदेत सांगितले की, इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांदरम्यान शत्रूत्व संपवून दोस्ती करण्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न राहील. आपल्याला माहित असेलच की, इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात मागील 69 वर्षापासून शत्रूत्व आहे. इस्त्रायलने आतापर्यंत इराण, इराक, सीरिया, येमेन, सौदी अरेबिया, जॉर्डन यासारख्या आखाती देशांशी युद्धे केली व दिमाखात जिंकली सुद्धा. इस्त्रायल जगातील असा पहिला देश आहे जेथे प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीला आर्मी ज्वॉईन करावीच लागते. मग तो पुरुष असो अथवा महिला. 34 टक्के महिला लष्करात...
 
- इस्त्रायलची एकून लोकंसख्या सुमारे 86 लाख (2016 च्या आकडेवारीनुसार) च्या आसपास आहे. 
- देशात सैनिकांची संख्या 31 लाखांच्या घरात आहे. ज्यात पुरुषांची संख्या 1,554,186 आहे तर, महिला सैनिकांची संख्या 1,514,063 इतकी आहे. 
- अशा प्रकारे इस्त्रायल जगातील एकमेव असा देश आहे, जेथे लष्करात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचीही संख्या आहे. 
- लष्करी ट्रेनिंगमध्ये महिला किंवा पुरुष असा कोणताही भेदभाव ठेवला जात नाही. जितके हार्ड ट्रेनिंग पुरुषांना दिले जाते तेवढेच ते महिलांनाही दिले जाते.
 
अरब देशासोबतच्या युद्धानंतर महिलांना दिले गेले स्थान-
 
- महिलांना आर्मीत भरती करण्याची प्रक्रिया 1948 च्या (अरब कंट्रीज-इस्त्रायल युद्ध)नंतर सुरु झाली. 
- पुरुषांची संख्या कमी असल्याने सुमारे 20 हजार महिलांना आर्मीत भरती केले गेले.
- या युद्धात इस्त्रायल एकटा होता तर दुस-या बाजूने जॉर्डन, लेबनान, इजिप्त, सीरिया, येमेन आणि सौदी अरब असे देश होते. 
- या भयानक युद्धात इस्त्रायल लष्कराला सैनिकांचा तुटवडा जाणवू लागताच सरकारने महिलांसाठीही दारे उघडली. 
- दुसरीकडे, तेथील ज्यू महिलांनीही अशी काही हिंमत दाखवली जगात इस्त्रायलीचे कौतूक झाले. 
- यानंतर टप्प्याटप्प्याने इस्त्रायली लष्करात महिलांची संख्या वाढत गेली, जी आता पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे १५ लाखांच्या वर महिला सैनिक आहेत. 
- शेजारील शत्रू राष्ट्र पॅलेस्टिनी दहशतवादी कारवाया कायम करत असल्याने महिला सैनिकांसाठी एवढ्या कठिण व कडक नियम, पद्धती आहेत की, इस्त्रायली महिलाही या दहशतवाद्यांना पुरुन उरतात.
 
कॉम्बेट रोलमध्‍ये महिला-
 
- क्लास 16 एनुसार लष्‍करी सेवेत महिला कॉम्बेट सोल्जर्ससाठी 3 वर्ष सेवा देणे सक्तीचे आहे. 
- 38 वर्षापर्यंत रिझर्व्ह सर्व्हिस सुरु ठेवावी लागते. 
- प्रत्येक वर्षी 1500 महिला कॉम्बेट सोल्जर्स आयडीएफमध्‍ये येतात. 
- साल 2000 पूर्वी महिलांना कॉम्बेट रोलसाठी निवडले जात नव्हते. 
- 2014 मध्‍ये आयडीएफने ओशरत बचरला इस्रायलची पहिली महिला कॉम्बेट बटालियनचा कमांडर निवडले.

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इस्त्रायल फिमेल सोल्जर्सचे 15 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...