आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानची भारताला आणखी ताकद, हवेत आणि समुद्रातही चालणार हे लढाऊ विमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूएस-2 एम्फिबियस एयरक्राफ्ट.... - Divya Marathi
यूएस-2 एम्फिबियस एयरक्राफ्ट....
इंटरनॅशनल डेस्क- जपानचे पंतप्रधान शिंजो आबे बुधवारी दोन दिवसाच्या भारत दौ-यावर अहमदाबादला पोहचले आहेत. नरेंद्र मोदींनी त्यांचे एयरपोर्टवर स्वागत केले. आबे यांच्या हा दौरा खूपच खास आहे. कारण भारत-जपान यांच्यात डिफेन्स, ऑटोमोबाईल, ट्रान्सपोर्ट सारख्या सेक्टरमध्ये काही करार झाले. यात सर्वात खास जपानचे यूएस-2 एम्फिबियस एयरक्राफ्टचाही समावेश आहे. ज्यात मागील तीन वर्षापासून दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु होती. आधी ही डील किंमतीतील तफावतीमुळे होऊ शकली नव्हती. मात्र आता जपान भारताला कमी किंमतीत अशी 12 विमाने विकायला तयार झाला आहे. या डीलमधून जपानला 10 हजार कोटी रुपये मिळतील. काय आहे एम्फिबियस एयरक्राफ्टचे वैशिष्ट्ये...
 
- यूएस-2 एम्फिबियस जगातील असे एकमात्र एम्फिबियस विमान आहे जे पाण्यात आणि हवेतही सहज टेक ऑफ आणि लॅंडिंग करते. हे विमान खवळलेल्या समुद्रातही उतरू शकते. तसेच यात लांब पल्ल्याच्या असैन्य व सैन्य एअॅप्लीकेशन्स आहेत. 
- यूएस-2 सर्वात मजबूत विमानांपैकी एक आहे. 30-38 किलोमीटर प्रति तास विंड स्पीडने याला समुद्रासह छोट्या छोट्या नदी, तलाव व धरणांत ऑपरेट केले जाऊ शकते. 
- सुमारे 30 लोक आणि 18 टन वजनासह एका वेळी ते 4,500 किलोमीटर अंतर पार करू शकते. 
- या एयरक्राफ्टमध्ये चार टर्बो इंजिन आहेत आणि याचा प्रयोग सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशनमध्ये केला जातो. 
- इंडियन नेवीशिवाय कोस्ट गार्ड सुद्धा या एयरक्राफ्टला ऑपरेट करेल. 
- युद्धाच्या काळात एयरक्राफ्टमधून एका वेळी 30 जवानांसह उड्डाण करू शकते.
 
एयरक्राफ्टवर एक नजर-

- लांबी : 33.46 मीटर
- ऊंची : 9.8 मीटर
- विंगस्पॉन : 33.15 मीटर
- विंग एरिया : 135.8 मीटर
- मॅग्जिमम स्पीड - 560 किमी प्रतितास.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहबा, एम्फिबियस एयरक्राफ्टचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...