आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानी सैन्याने ओलांडल्या होत्या क्रूरतेच्या सीमा, चीनच्या 80 हजार महिलांवर केला होता बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानी सैन्याने नानजिंग शहरात केवळ सहा आठवड्यांत 3 लाख लोकांचा जीव घेतला होता, तर 80 हजार महिलांवर बलात्कार केला होता. - Divya Marathi
जपानी सैन्याने नानजिंग शहरात केवळ सहा आठवड्यांत 3 लाख लोकांचा जीव घेतला होता, तर 80 हजार महिलांवर बलात्कार केला होता.
इंटरनॅशनल डेस्क- जपान आज आपला स्थापना दिवस साजरा करत आहे. जगात जपानला आज अनोख्या इनोव्हेशनसाठी ओळखले जाते. मात्र, एके काळी जपानची ओळख सर्वात हिंसक देश म्हणून होती. जपानचे हे भयानक रूप जगासमोर दुस-या महायुद्धादरम्यान पुढे आले होते. दुस-या महायुध्‍दात जपानी सैन्याच्या क्रूरतेचे नवीन रूप समोर आले होते. जपानी सैनिक गिसाबुरो इकेदाने आपल्या लिहिलेल्या या पुस्तकात 19 जून, 1938 च्या घटनेचा खुलासा केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, महायुध्‍दाच्यावेळी जपानी सैनिकांनी एक हजार नागरिकांना जोंगमऊ शहराबाहेर काढले व पिवळ्या नदीत बुडवून मारले होते. जपानच्या सैनिकाचे हे खुलासे चीनचे पुराभिलेख प्राधिकरण दुस-या महायुध्‍दाला 70 वर्ष पूर्ण झाल्याने एक-एक करुन प्रसिध्‍द केले होते. चीनच्या नागरिकांचे मांसही खाल्ले जात होते, असा दावा शासकीय पुराभिलेख प्रशासनाच्या वतीने प्रसिध्‍द केलेल्या कागदपत्रांमध्‍ये केला गेला होता. नानजिंग नरसंहारामध्‍ये झाला होता 80 हजार महिलांवर बलात्कार...
 
- जपानी सैन्याचे दुस-या महायुध्‍दाच्यावेळी या क्रूरतेला दुसरे चीन-जपान युध्‍दा या नावाने ओळखले जाते. 
- यास 20 व्या शतकातील सर्वात मोठे आशियाई युध्‍द म्हणून ओळखले जाते. हे युध्‍द 1937 ते 1945 दरम्यान लढले गेले. 
- त्या वेळी नानजिंग चीनची राजधानी होती. 1937 मध्‍ये दोन्ही देशांमधील सैनिक एकमेंकांशी भिडले होते. 
- जपानी सैन्याने याच वर्षी जुलैमध्‍ये बीजिंगवर आपले नियंत्रण मिळवले होते. यानंतर जपानने चहर व सुईयुनानवर ताब्यात घेतले. मात्र शान्सीमध्‍ये चिनी सैन्याने जपान जबरदस्त टक्कर दिली. 
- यानंतर जपानी सैन्याने शांघायवर ताबा मिळवला व 13 डिसेंबर रोजी चीनची राजधानी नानजिंगवर हल्ला केला. 
- या युध्‍दाला खरी सुरुवात जेव्हा जपानी सैन्याने नानजिंग शहरात केवळ सहा आठवड्यांत 3 लाख लोकांचा जीव घेतला होता. 
- दुसरीकडे 80 हजार महिला बलात्काराच्या शिकार झाल्या होत्या. जपानी सैनिकांनी पूर्ण शहर उद्ध्‍वस्त केले होते. 
- जपान येथे थांबला नाही, त्याने उत्तर, पूर्व आणि दक्षिण चीनवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र पश्चिम व वायव्य भागावर नियंत्रण मिळवण्‍यात अपयश आले. 
- एकानंतर एक विजयानंतर जपानने 1941 मध्‍ये पर्ल हार्बरवर हल्ला केला. यानंतर अमेरिकेने जपानविरुध्‍द युध्‍दाची घोषणा केली. 
- दुसरीकडे सोव्हिएत संघाने जपानच्या ताब्यातील मंचुरियावर हल्ला केला. यानंतर अमेरिका चीनला जपानविरुध्‍द युध्‍दात मदत केली.
 
जपानने केला समर्पण-
 
- चीन व जपान यांच्यामधील युध्‍द आतापर्यंत दुसरे महायुध्‍दाचा भाग बनला होता. जपान दुर्बळ होत चालला होता. 
- हिरोशिमा आणि नागासाकीवर अणु हल्ल्यानंतर जपानमध्‍ये 1945 मध्‍ये आपला पराभव मान्य केला व सर्मपण केले. 
- चीनचा दावा आहे, की या युध्‍दाच्या वेळी चीनच्या नागरिकांनी व सैनिकांसह एकूण साडेतीन कोटी लोक मारली गेली होती. 
- दुसरीकडे जपानच्या संरक्षण मंत्रालयानुसार जपानचे 2 लाख सैनिक मारण्‍यात आले होते.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा जपानी सैन्याचे चिनी नागरिकांवर केलेले क्रूर अत्याचार...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...